वृत्ताचा धक्का : पदाधिकार्‍याचा मृत्यू

By Admin | Updated: June 4, 2014 01:35 IST2014-06-04T01:27:10+5:302014-06-04T01:35:55+5:30

कन्नड : केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त कळताच हा धक्का सहन न झाल्याने कन्नड येथील भाजपाच्या शहर उपाध्यक्षांचा मंगळवारी दुपारी हृदयविकाराने मृत्यू झाला.

Note: Official death | वृत्ताचा धक्का : पदाधिकार्‍याचा मृत्यू

वृत्ताचा धक्का : पदाधिकार्‍याचा मृत्यू

कन्नड : केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त कळताच हा धक्का सहन न झाल्याने कन्नड येथील भाजपाच्या शहर उपाध्यक्षांचा मंगळवारी दुपारी हृदयविकाराने मृत्यू झाला. कन्नड येथील भाजपा शहर उपाध्यक्ष व खादी ग्रामोद्योग मंडळाचे उपाध्यक्ष असलेले शेख जफर शेख जलालुद्दीन (४०) सकाळी घरात टी.व्ही. बघत असताना त्यांना सदर वृत्त कळताच हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने कन्नड येथील खाजगी दवाखान्यात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबादला नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. शेख जफर हे मुंडे यांचे कट्टर समर्थक होते. आधीच शोकमग्न असलेल्या कन्नडकरांना या दुसर्‍या वार्तेने जबर धक्का बसला. मंगळवारी सायंकाळी ४ वाजता येथे त्यांचा दफनविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. कन्नड, वासडी परिसरात या घटनेमुळे व्यापार्‍यांनी आपापली दुकाने बंद ठेवून दुखवटा पाळला. (वार्ताहर)

Web Title: Note: Official death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.