शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातच नव्हे, परराज्यांतही फोडल्या सहकारी बँका

By admin | Updated: August 18, 2014 00:37 IST

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती बँका फोडणाऱ्या कुख्यात उमप टोळीने केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर परराज्यांतही बँका फोडण्याचे अनेक गुन्हे केले आहेत.

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती बँका फोडणाऱ्या कुख्यात उमप टोळीने केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर परराज्यांतही बँका फोडण्याचे अनेक गुन्हे केले आहेत. औरंगाबादेत पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वी नुकतीच टोळी उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा फोडून आली होती. या बँकेतून आरोपींनी साडेआठ लाख रुपये लुटले होते, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. ‘त्या’ गुन्ह्यात आरोपींना ताब्यात घेण्यासाठी कानपूर पोलिसांचे पथक औरंगाबादेत येणार असल्याचे गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले. पाच दिवसांपूर्वी संशयावरून सिडको एमआयडीसी पोलिसांनी एपीआय कॉर्नर येथील लोकसेवा हॉटेलसमोर पाच आरोपींना पकडले होते. त्यावेळी आरोपींनी आपली खोटी नावे सांगितली. ‘खाक्या’ दाखविताच आरोपींनी खरी नावे सांतिगली. तेव्हा ही तर राज्यभरातील अनेक जिल्हा मध्यवर्ती बँका फोडणारी उमप टोळी असल्याचे समोर आले.पोलिसांच्या हाती लागलेल्या या आरोपींमध्ये उमप टोळीचा म्होरक्या तथा कुख्यात गुन्हेगार सुरेश काशीनाथ उमप (५०, रा. कमळापूर, मोरशी, अमरावती, सध्या सातारा परिसर, औरंगाबाद) याच्यासह विजय भास्कर शिंदे (३०, रा. पिंपरी, हवेली, पुणे), अजिंक्य पांडुरंग सपकाळ (२१, रा. नवघर रोड, भायंदर, ठाणे), श्रीकांत ऊर्फ कान्हा किसनराव उमप (२४, रा. पार्डी, मोरशी, अमरावती) व अनिल शिवसागर दुबे (४७, रा. नालासोपारा, ठाणे) यांचा समावेश होता. या सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्रात बँक फोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तपासात या आरोपींनी ९ आॅगस्ट रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेची भिंत फोडून तिजोरीतील साडेआठ लाख रुपये लुटल्याची कबुली दिली. ती बँक फोडल्यानंतर हे आरोपी जीपने अमरावतीमार्गे औरंगाबादला आले होते, असेही तपासात समोर आले. आरोपींनी त्या बँकेतून लुटलेली रक्कम कोठे ठेवली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, हे आरोपी पकडल्याची माहिती मिळाल्यानंतर कानपूर पोलिसांचे एक पथक औरंगाबादला येण्यासाठी निघाले आहे. या टोळीला कानपूर पोलीस अटक करून घेऊन जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक आघाव यांनी सांगितले. लुटमारीच्या पैशांतून घेतला बंगलाया टोळीचा म्होरक्या सुरेश उमप याने २०११ मध्ये पुणे जिल्ह्यात काही बँका फोडल्या होत्या. त्यातून मिळालेल्या पैशांमधून त्याने औरंगाबादेतील देवळाई परिसरातील विजयनगरात एक आलिशान बंगला खरेदी केला होता. पोलिसांनी ओळखू नये म्हणून चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करून तो औरंगाबादेत स्थायिक झाला होता. येथून तो आपली टोळी आॅपरेट करीत असे.