शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण नव्हे वडिलांच्या धाकाने सोडले घर; ७० किमी चालत दोघे पोहचले रेल्वेस्टेशनवर, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 18:34 IST

छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर दोन्ही अल्पवयीन मुले सापडले

- श्यामकुमार पुरेसिल्लोड: सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार येथील दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण झाल्याचा गुन्हा ७ ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. मात्र, त्यांचे अपहरण झाले नव्हते तर वडिलांच्या धाकाने त्यांनी घर सोडल्याचे स्पष्ट झाले असून दोघेही सुखरूप आहेत. मुलांच्या एका नातेवाईकाने छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वेस्टेशनवर दिसताच वेळीच थांबवून ठेवल्याने दोघेही आणखी दूर जाण्यापासून वाचले.

शेख अरबाज शेख अय्युब ( १६), शेख अमान शेख गुलाब (१५, रा.दोन्ही बोरगाव बाजार) असे अल्पवयीन मुलांची नावे आहेत. बुधवारी सकाळी हे दोघे स्वतःच्या घरच्या बकऱ्या व काही जनावरे घेऊन गावातील तलावाजवळ असलेल्या खंडोबा महाराज मंदिराजवळ बकऱ्या चारण्यासाठी गेले होते. दुपारी जवळच असलेल्या तलावात दोघेही अंघोळ करण्यासाठी उतरले. दरम्यान, तेथे आलेल्या अरबाजचे वडील शेख आयुब यांनी, 'तुम्हाला पाण्याचा अंदाज नाही, लवकर बाहेर निघा' असे म्हणत रागावले. यामुळे दोघेही बाहेर आले. मात्र, घरी गेल्यानंतर वडील पुन्हा रागावतील अशी भीती वाटल्याने दोघांनी तेथून निघण्याचा निर्णय घेतले. बकऱ्या तिथेच सोडून दोघेही दुपारी २ वाजेच्या दरम्यान तेथून सिल्लोडकडे पायी निघाले. सायंकाळी ७ वाजता सिल्लोडला आले तर तेथून पुन्हा छत्रपती संभाजीनगरकडे ते चालत निघाले. फुलंब्री येथे आल्यानंतर त्यांनी एकास लिफ्ट मागितली. त्यानंतर रात्री छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वेस्टेशनजवळ ते पोहचले. 

दरम्यान, कोणत्याही ट्रेनमध्ये बसून दूर जाण्याच्या इच्छेने दोघेही आज, सकाळी १० वाजता स्टेशनवर आले. ट्रेनमध्ये बसण्याच्या बेतात असतानाच बोरगाव बाजार येथील एका नातेवाईकांने त्यांना पाहिले. त्याने मुलांना थांबवून ठेवत तत्काळ मुलांच्या वडिलांना माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी रेल्वे स्टेशनवर येत मुलांना ताब्यात घेत सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर केले. पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक मनीष जाधव, पोहेका विष्णू कोल्हे यांनी जाब जवाब घेऊन दोन्ही मुलांना त्यांच्या आईवडिलांच्या स्वाधीन केले.

मुलांचे अपहरण झाले नव्हते, त्यांनी स्वतःहून पलायन केले होते. छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वेस्टेशन येथे सापडल्यानंतर त्यांना आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे.- रवींद्र ठाकरे, पोलीस निरीक्षक, सिल्लोड ग्रामीण.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरKidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारी