शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
2
वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
4
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
5
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
6
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
7
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
8
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
9
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
10
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
11
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार
12
भारतावर कुरघोडी करणाऱ्या चीनची लागली 'लंका'! 'या' क्षेत्रात मोठी मंदी, खरेदी करायलाच कोणी नाही
13
Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं
14
कोरोनाचा कहर, बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टर म्हणाले... 
15
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
16
जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार
17
व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?
18
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
19
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस; महिन्याभरात दुपटीपेक्षा अधिक रिटर्न, किंमत किती?
20
Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण

आरटीई प्रतिक्षा यादीत 'नॉट ॲप्राेच' नावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 14:33 IST

गेली ३ महिने ज्या विद्यार्थ्यांनी शाळांना भेट दिली नाही किंवा प्रवेशही निश्चित केला नाही, अशा नॉट ॲप्रोच विद्यार्थ्यांचा प्रतीक्षा यादीत प्रवेश केल्याचा धक्कादायक प्रकार आरटीई पालक संघाने समोर आणला आहे. 

औरंगाबाद : आरटीईअंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात प्रतिक्षा यादीतील प्रवेश सुरू आहेत. पहिल्या फेरीतील प्रवेश प्रक्रियेत पात्र, पण गेली ३ महिने ज्या विद्यार्थ्यांनी शाळांना भेट दिली नाही किंवा प्रवेशही निश्चित केला नाही, अशा नॉट ॲप्रोच विद्यार्थ्यांचा प्रतीक्षा यादीत प्रवेश केल्याचा धक्कादायक प्रकार आरटीई पालक संघाने समोर आणला आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची नावे गेली कुठे, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शालेय प्रवेशात २५ टक्के आरक्षणाची तरतूद आहे. आरटीईअंतर्गतची प्रवेश प्रक्रिया जिल्ह्यातील ५८४ शाळांमध्ये ऑनलाईन राबविण्यात येत आहे. आरटीईसाठी १६,५०० पेक्षा अधिक अर्ज आले होते. त्यापैकी ५,६७६ विद्यार्थ्यांची निवड झाली, तर १९१४ जणांची सोडतीनुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली.

पहिल्या फेरीत ३ हजार १०१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. उर्वरित १५३९ जागांसाठी प्रतीक्षा यादी जाहीर झाली. ३ ते ८ ऑक्टोबरपर्यंत प्रतीक्षा यादीतील प्रवेश सुरू आहेत. आर. जे. इंटरनॅशनल शाळेच्या प्रतीक्षा यादीत ९ नॉट ॲप्रोच विद्यार्थी घुसविण्यात आल्याचा प्रकार संघाच्या प्रशांत साठे यांनी समोर आणला आहे. हे सर्व उदाहरण असून सर्वच याद्यांमध्ये घोळ असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नॉट ॲप्रोच विद्यार्थ्यांचा समावेश प्रतीक्षा यादीत केल्याने आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांवर अन्यायच झाल्याचा आरोप साठे यांनी केला. 

टॅग्स :Educationशिक्षणRight To Educationशिक्षण हक्क कायदाSchoolशाळाStudentविद्यार्थी