शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

उत्तर महाराष्ट्र, विदर्भाला झुकते माप; मराठवाड्याच्या सिंचन प्रकल्पांसाठी आखडला हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 6:01 PM

Irrigation projects in Marathwada :मागील सरकारनेही मराठवाड्याकडे दुर्लक्ष केले, तशीच परिस्थिती या सरकारच्या काळात निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देमागील सरकारच्या काळात २०१९ पर्यंत, नाशिक, अमरावती विभागाकडे मोठ्या प्रमाणात सिंचन प्रकल्पांना निधी

- विकास राऊत

औरंगाबाद : मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांना मागील पाच वर्षांत वाटाण्याच्या अक्षतेप्रमाणे निधी देऊ केला आहे. तुलनेत उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाला झुकते माप देत कोट्यवधीचा निधी देऊन बहुतांश प्रकल्प मार्गी लागतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मागील सरकारनेही मराठवाड्याकडे दुर्लक्ष केले, तशीच परिस्थिती या सरकारच्या काळात निर्माण झाली आहे. निधीमध्ये डावलण्याच्या प्रकारामुळे विभागातील सिंचन प्रकल्पांची वाट अवघड झाली असून नांदूर मधमेश्वर, उर्ध्व पैनगंगा, कृष्णा मराठवाडा, कृष्णा-भीमा स्थिरीकरण या प्रकल्पांना कधी निधी मिळणार असा प्रश्न आहे. ( North Maharashtra, Vidarbha gave lots; Hands down for irrigation projects in Marathwada) 

कृष्णा-मराठवाडा प्रकल्प राज्यपालांच्या विभागनिहाय निधी वाटपाच्या सूृत्राबाहेर ठेवला आहे. त्यामुळे सूत्राच्या नियमानुसार या प्रकल्पाला निधी मिळतो आहे. मागील पाच वर्षांत विभागासाठी १० हजार कोटींच्या आसपास सिंचनासाठी केलेल्या तरतुदीपैकी अतिशय कमी रक्कम मराठवाड्याच्या वाट्याला आली आहे. परिणामी सिंचनाच्या अनुशेषाचा टक्का वाढतो आहे.

मागील सरकारच्या काळात २०१९ पर्यंत, नाशिक, अमरावती विभागाकडे मोठ्या प्रमाणात सिंचन प्रकल्पांना निधी दिला गेला, त्या तुलनेत मराठवाड्याला कमी निधी मिळाला. विद्यमान सरकारच्या काळात दोन वर्षांपासून कोरोना परिस्थितीमुळे या प्रकल्पांसाठी तरतुदीत निधी मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याची माहिती तज्ज्ञांकडून मिळत आहे.

प्रकल्पनिहाय आलेला निधी असानिम्न दुधना (पूर्ण निधी)२०१७ - ४५२ कोटी,२०१८- १२२ कोटी,२०१९- ४४ कोटी,२०२०- ५५ कोटीएकूण- ८१३

नांदूर मधमेश्वर औरंगाबाद विभाग (२० टक्के)२०१७ साली १ रुपया नाही.२०१८ - ३४ कोटी२०१९ - ५ कोटी२०२० - २० कोटी२०२१ -२० कोटीएकूण - ७९ कोटी

नांदूर मधमेश्वर नाशिक विभाग प्रकल्प- (६० टक्के)२०१७- ७५ कोटी२०१८ - १०५ कोटी२०१९- ११२ कोटी२०२०- १३ कोटी२०२१- ३ कोटीएकूण- ५०७

उर्ध्व पैनगंगा प्रकल्प- (६० टक्के)२०१७ - ७६ कोटी२०१८ - १८३ कोटी२०१९ - ३९२ कोटी२०२०- १६५ कोटी२०२१ - २२ कोटीएकूण- ८३९ कोटी

कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प (२५ टक्के)२०१७- ११५ कोटी२०१८- १४५ कोटी२०१९ - २९१ कोटी२०२० - ३०५ कोटी२०२१ - ४७५ कोटीएकूण- १३३१ कोटी

कृष्णा भीमा स्थिरीकरण- (२५ टक्के)२०१७- १५ कोटी,२०१८ - १०५ कोटी२०१९- २६३ कोटी२०२०- ३८० कोटी२०२१ - ३६५ कोटीएकूण ११२८ कोटी

टॅग्स :MarathwadaमराठवाडाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पfundsनिधीState Governmentराज्य सरकार