नोरा फतेहीने दाखवली नव्या डान्सची झलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:04 IST2020-12-29T04:04:46+5:302020-12-29T04:04:46+5:30

लेकीबद्दल का वाटली नीना गुप्तांना भीती अभिनेत्री नीना गुप्ता यांची एकुलती एक लेक मसाबा गुप्ताची एक इन्स्टाग्राम पोस्ट सध्या ...

Nora Fatehi shows a glimpse of the new dance | नोरा फतेहीने दाखवली नव्या डान्सची झलक

नोरा फतेहीने दाखवली नव्या डान्सची झलक

लेकीबद्दल का वाटली नीना गुप्तांना भीती

अभिनेत्री नीना गुप्ता यांची एकुलती एक लेक मसाबा गुप्ताची एक इन्स्टाग्राम पोस्ट सध्या जाम चर्चेत आहे. या पोस्टमध्ये मसाबाने तिची आई नीना गुप्ता एका घटनेने प्रचंड घाबरली होती याचा किस्सा शेअर केला आहे. ख्रिसमसच्या दिवशी नीना गुप्ता लेकीच्या काळजीने अचानक घाबरून गेल्या. सकाळचे ९.३० वाजले तरी मसाबा झोपेतून उठली नव्हती. इतक्या वेळ मसाबा झोपू शकत नाही, हे माहीत असल्याने नीना घाबरल्या आणि त्या लेकीच्या काळजीने त्यांच्या मनात धस्स् झाले. मसाबाने हाच किस्सा शेअर केला आहे. तिने लिहिले, ‘नीना गुप्तांकडून गुड मॉर्निंग. त्या मला पाहायला येत आहेत. कारण मी मेले, असे त्यांना वाटले. मी सकाळी ९.३० वाजता उठले. यापूर्वी असे कधीच झाले नाही. म्हणून माझे काही बरेवाईट तर झाले नाही ना, असे तिला वाटले. हे ख्रिसमस आहे?’ मसाबाची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होते आहे.

Web Title: Nora Fatehi shows a glimpse of the new dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.