नॉन बॅ्रन्डेड चॉकलेट-गोळ्यांचा बाजार
By Admin | Updated: February 2, 2016 00:29 IST2016-02-01T23:46:49+5:302016-02-02T00:29:30+5:30
शिरीष शिंदे , बीड रंगबिरंगी गोळ्या-चॉकलेट, मुरकूल अशा नाना प्रकारच्या खाद्य पदार्थांकडे लहान मुले पटकण आकर्षीत होतात व खरेदी करतात.

नॉन बॅ्रन्डेड चॉकलेट-गोळ्यांचा बाजार
शिरीष शिंदे , बीड
रंगबिरंगी गोळ्या-चॉकलेट, मुरकूल अशा नाना प्रकारच्या खाद्य पदार्थांकडे लहान मुले पटकण आकर्षीत होतात व खरेदी करतात. ही बाब लक्षात धरुन गल्ली-बोळातील दुकानांमध्ये नॉन बॅ्रन्डेड अर्थात परवाना नसलेल्या लहान-मोठ्या कंपण्याकडून चटकण आर्कर्षीत करणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या गोळ्या-चॉकलेट व इतर पर्दाथ सर्रासपणे विक्री केली जात असल्याची धक्कादायकबाब ‘लोकमत’ सर्व्हेक्षणातून समोर आली आहे.
बीड शहरातील गल्ल्या-बोळ्यांमध्ये परवाना नसणाऱ्या दुकानांची संख्या अधीक आहेत. या दुकानांवर ठेवण्यात येणारा माल म्हणजेच खाद्य पदार्थही परवाना नसलेले असतात. अशा दुकानांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दुकाने वाढत आहेत मात्र त्यांची नोंदणी होत नाही. ही गंभीर समस्या वाढतच चालली आहे. त्यातच नॉन बॅ्रन्डेड वस्तुची सर्रास विक्री होत आहे. यामुळे लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हीबाब अतिशय गांर्भीयाने घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण अशा प्रकारच्या गोळ्या-बिस्टिक व इतरा खाद्यपदार्थातून विषबाधा होऊन मृत्यू झाला तर उत्पादन करणाऱ्या व्यक्तीस पकडणे कठीण जाईल यात शंकाच नाही.
गल्ली बोळीतील दुकाने निशाण्यावर
रस्त्याच्या बाजुला गाळ्यांमध्ये किंवा घरामध्ये सुरु असणाऱ्या दुकानांची तपासणी अन्न व औषध प्रशासन विगाकडून होऊ शकते. या धाकापोटी परवाना घेऊन बॅ्रन्डेड खाऊची विक्री केली जाते. त्यात कसल्याही प्रकारची तडजोड केली जात नाही. मात्र गल्ली बोळात तपासणी होत नाही अशी धारणा अनेक दुकानदारांची असल्याने त्या ठिकाणी सर्रासपणे निकृट व नॉन बॅ्रन्डेड गोळ्या-बिस्कीट व इतर खाद्य पदार्थ विक्रीसाठी ठेवलेले आढळून येतात.
कमीशनला भाळतात दुकानदार
नॉन बॅ्रन्डेड अन्न पदार्थ लहान मुलांसाठी घातक असतात ही बाब दुकानदारांनही माहिती असते मात्र तरिही ते असे पदार्थ विक्रीसाठी आपल्या दुकानात ठेवतात कारण बॅन्डेड वस्तुच्या विक्रीवर कमीशन कमी मिळते मात्र नॉन बॅ्रन्डेड असलेल्या गोळ्या-बिस्कीटाक जवळपास ६० टक्क्यापर्यंत कमीशन मिळते त्यामुळे अनेक लहान दुकानदार अशा प्रकारचा माल विक्रीसाठी दुकानात ठेवतात. चमचमीत व चटकण आकर्षीत करणाऱ्या अशा वस्तु विक्री होण्यास फारसा वेळ लागत नाही व पैसेही मोकळे होतात हा दुहेरी फायदा दुकानदार पहातात.
या वस्तु असतात विक्रीला
गल्ली-बोळातील दुकानांमध्ये फार वर्षापासून मुरकूल हा प्रकार विक्री केला जातो. ही मुरकुले कशा प्रकारच्या तेलात तळली गेली आहेत याची खातरजमा केली जात नाही. मात्र चवीला चांगले लागत असल्याने मुरकुलांची विक्री अधिक आहे. यासह गुलाब जामुन, सोनपापडी, लहान चकली, गोड पेढा, चिप्स, बालुशाही, टोस्ट यांची विक्री होते. बॅन्डेड वस्तुंच्या तुलनेल वरील वस्तुंच्या किमतीही त्या मानाने अधिक नसतात व खायलाही चवदार लगातात त्यामुळे अशा पदार्थांकडे लहानमुले आकर्षीत होतात.
भारतीय खाद्य सुरक्षा व मानक प्राधिकरण (एफएसएसआय) च्या अंर्तगत मानवासाठी बनविण्यात येणाऱ्या प्रत्येक खाद्य पदार्थ करणाऱ्या संस्था, कंपनीची अन्न व औषध प्रशासन विभागाकडे नोंद असणे आवश्यक आहे. त्यासाठी परवाना दिला जातो. पदार्थ बनविल्याची तारीख अर्थात मॅन्युफॅक्चरींग डेट, एक्पायरी डेट, पदार्थामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तु, घ्यावयाची काळजी आदीबाबींचा उल्लेख उत्पादानाच्या पँकींगवर असणे आवश्यक आहे.