'उमेदवारी जाहीर होईपर्यंत माघार नाही'; अंबादास दानवेंचा लोकसभा लढण्याचा दावा कायम
By बापू सोळुंके | Updated: March 21, 2024 17:59 IST2024-03-21T17:58:31+5:302024-03-21T17:59:39+5:30
मागील दोन लोकसभा निवडणुकीपासून आपण पक्षाकडे लोकसभेची उमेदवारी मागत आहोत.

'उमेदवारी जाहीर होईपर्यंत माघार नाही'; अंबादास दानवेंचा लोकसभा लढण्याचा दावा कायम
छत्रपती संभाजीनगर: औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून आपण पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे ,जोपर्यंत पक्ष कोणाचीही उमेदवारी जाहीर होत नाही, तोपर्यंत आपण माघार घेणार नसल्याचा दावा, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यां पत्रकार परिषदेत केला .
आ. दानवे म्हणाले, मागील दोन लोकसभा निवडणुकीपासून आपण पक्षाकडे लोकसभेची उमेदवारी मागत आहोत. आताही उमेदवारी मागितली असल्याचा पुनरुच्चार करत दानवे म्हणाले, पक्षाने पक्षाने अद्याप उमेदवार घोषित केलेला नाही, यामुळे पक्षाची उमेदवारी घोषित होईपर्यंत आपला दावा कायम असेल. खैरे यांना तिकीट दिल्यास ते ४० गावात गेले तर मी ८० गावात जाऊन प्रचार करू असेही आ. दानवे म्हणाले . राज ठाकरे यांना महायुतीमध्ये घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न भाजपचा आहे का ?या प्रश्नाचे उत्तर देताना एखाद्याला डोक्यावर घ्यायचं आणि खाली उतरायचं ही भाजपची जुनीच पद्धतच असल्याची टीकाही त्यांनी केली. वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर हे भाजपला मदत होईल असे काहीही करणार ,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महिला आघाडीला चहाला बोलावले की त्यांची नाराजी जाईल
निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती चंद्रकांत खैरे आणि तुमच्यातील वाद तसेच पक्षप्रमुखांना भेटून दिल्यामुळे नाराज झालेले महिला आघाडी याचा पक्षाला फटका बसेल का? या प्रश्नाचे उत्तर देताना दानवे म्हणाले तिकीट मागणे म्हणजे काही वाद नाही. दुसरीकडे महिला आघाडी यांना सकाळी साडेअकराची वेळ देण्यात आली होती. त्या नऊ वाजता आल्या यामुळे त्यांची भेट झाली नाही. महिला आघाडीला सायंकाळी चहा पिण्यास बोलवले की त्यांची नाराजी दूर होते ,असा दावा आमदार दानवे यांनी केला.