उपचार नको, आता घरीच थांबलेलं बरं; संपामुळे घाटीतील रुग्णसंख्या घटली

By संतोष हिरेमठ | Updated: March 20, 2023 13:40 IST2023-03-20T13:35:16+5:302023-03-20T13:40:36+5:30

संपाच्या सातव्या दिवशी सोमवारी संपकरी कर्मचाऱ्यांनी घाटीत थाळीनाद करीत फेरी काढली.

No treatment, better to stay at home now; Due to the strike, the number of patients in the valley decreased | उपचार नको, आता घरीच थांबलेलं बरं; संपामुळे घाटीतील रुग्णसंख्या घटली

उपचार नको, आता घरीच थांबलेलं बरं; संपामुळे घाटीतील रुग्णसंख्या घटली

छत्रपती संभाजीनगर : परिचारिका, वर्ग-३,  चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा संप सलग सातव्या दिवशीही सुरूच आहे. घाटी रुग्णालयात रुग्णसेवा कोलमडली आहे. त्यामुळे उपचार नको, आता घरीच बरे....असे म्हणून रुग्ण घाटीत येण्याचे टाळत आहेत.

संपाच्या सातव्या दिवशी सोमवारी संपकरी कर्मचाऱ्यांनी घाटीत थाळीनाद करीत फेरी काढली. यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. जुनी पेन्शनच्या मागणीसाठी यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या.

संपामुळे घाटीत आठवड्याभरापासून नियोजित शस्त्रक्रिया ठप्प आहेत. अनेक रुग्णांनी रुग्णालयातून सुटी करून घेतली. तर संपामुळे घाटीत येणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. परिचारिकांच्या जागेवर रुग्णसेवा देणाऱ्या नर्सिंगच्या विद्यार्थीही आता थकले आहे. त्यामुळे आता अन्य नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जाते आहे. 

अधिष्ठाता डॉ. संजय राठोड म्हणाले, रुग्णालयातील सेवा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. अतिसंवेदनशील सेवा सुरळीत ठेवण्यात आहे.

Web Title: No treatment, better to stay at home now; Due to the strike, the number of patients in the valley decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.