गॅसटंचाईचे ‘नो टेन्शन’; ४० हजार विद्यार्थ्यांसाठी सोलारवर शिजते खिचडी

By प्रशांत तेलवाडकर | Updated: March 14, 2026 10:38 IST2026-03-14T10:38:28+5:302026-03-14T10:38:43+5:30

भविष्यातील गॅस सिलिंडरची टंचाई विचारात घेता दोन वर्षापूर्वीच अन्नामृत फाउंडेशनने पर्याय शोधला होता.

No tension over gas shortage; Khichdi cooked on solar for 40,000 students | गॅसटंचाईचे ‘नो टेन्शन’; ४० हजार विद्यार्थ्यांसाठी सोलारवर शिजते खिचडी

गॅसटंचाईचे ‘नो टेन्शन’; ४० हजार विद्यार्थ्यांसाठी सोलारवर शिजते खिचडी

प्रशांत तेलवाडकर 
लोकमत न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर : एलपीजी सिलिंडरच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक स्वयंपाकगृहांपुढे अडचणी  येत असताना, इस्कॉनच्या अन्नामृत फाउंडेशनने वाफेवर चालणारी यंत्रणा आणि सौरऊर्जेचा वापर करून प्रभावी पर्याय उभा केला आहे. या प्रणालीमुळे दररोज सुमारे ३५ ते ४० हजार विद्यार्थी व कर्क रुग्णांसाठी  पोषणमूल्ये जपून कमी वेळात अन्न शिजवले जाते, तसेच एलपीजीवरील अवलंबित्वही कमी झाले आहे..

एलपीजी सिलिंडर कशासाठी?

पोळी करणे, शिरा करणे, तळणे, फोडणी देणे यासाठी एलपीजी सिलिंडरचा वापर होतो. मात्र, आता एलपीजी नसला तरी ‘पलेट शेगडी’चा वापर करण्यात येत आहे. यामुळे भविष्यात एलपीजी मिळाला नाही किंवा उशिरा मिळाला तरी अडचण येणार नाही.

अन्नामृत फाउंडेशनचा प्रयोग

अन्नामृत फाउंडेशन ही इस्कॉनअंतर्गत काम करणारी संस्था आहे. चिकलठाणा औद्योगिक परिसरातील ‘आयटी पार्क’ येथे त्यांच्या वतीने सामुदायिक स्वयंपाकघर चालविले जाते. आजमितीस जिल्ह्यातील दररोज ४० हजार शालेय विद्यार्थ्यांपर्यंत शालेय पोषण आहार तयार करून पोहचविण्याचे काम केले जाते.

फाउंडेशनअंतर्गत शहरी भागातील सुमारे १६८ शाळा व त्यातील ३८ हजार विद्यार्थी तसेच ८० बालवाड्यांमधील ३,५०० बालकांपर्यंत आहार पोहोचला जातो. याशिवाय  कर्करोग रुग्णांना जेवण दिले जाते. 

२ सिलिंडरवरच स्वंयपाक

भविष्यातील गॅस सिलिंडरची टंचाई विचारात घेता दोन वर्षापूर्वीच अन्नामृत फाउंडेशनने पर्याय शोधला होता. त्यांनी या स्वयंपाकगृहासाठी २५ किलोवॅटचे सोलार युनिट बसवत थर्मल इन्स्युलेटर तंत्रज्ञानाचा वापर केला.

त्यामुळे सामुदायिक स्वयंपाकघरात जाळ, धूरविरहित उष्णतेद्वारे अन्न शिजवण्यास सुरुवात केली. यात २ स्टीम बॉयलर, प्रत्येकी ६०० किलो क्षमतेचे ७ जॅकेटेड मेगा कुकर व स्टेनलेस स्टील इन्सुलेटेड पाइपिंग सिस्टम बसविली. जिथे दररोज २० ते २५ व्यावसायिक एलपीजी  गॅस सिलिंडर लागायचे तिथे आता केवळ दीड ते दोन सिलिंडरचा वापर होत अशून खर्चात बचत होत आहे.

Web Title : गैस की कमी की चिंता नहीं: 40,000 छात्रों के लिए सौर ऊर्जा से खाना

Web Summary : अन्नमृत फाउंडेशन प्रतिदिन 40,000 छात्रों और कैंसर रोगियों के लिए सौर ऊर्जा का उपयोग करके भोजन बनाती है। इससे एलपीजी सिलेंडरों पर निर्भरता कम होती है, भाप से चलने वाली प्रणालियों और थर्मल इन्सुलेशन का उपयोग किया जाता है। इस पहल में प्रतिदिन केवल दो एलपीजी सिलेंडर का उपयोग होता है, जो कि पहले के पच्चीस से काफी कम है।

Web Title : No Gas Shortage Worries: Solar Cooking for 40,000 Students

Web Summary : Annamrita Foundation uses solar energy to cook meals for 40,000 students and cancer patients daily. This reduces reliance on LPG cylinders, utilizing steam-powered systems and thermal insulation. The initiative uses only two LPG cylinders daily, a significant reduction from the prior twenty-five.