शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

औरंगाबाद परिमंडळात कृषी संजीवनी योजनेला झटका; शेतकर्‍यांकडे २,३१८ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 3:52 PM

कृषी पंपाकडे असलेल्या वीज बिलाची थकबाकी टप्प्याटप्प्याने भरण्यासाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेंतर्गत ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती; परंतु परिमंडळांतर्गत औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील ३ लाख ३२ हजार १० कृषीपंप ग्राहकांपैकी अवघ्या ३ हजार ९७७ ग्राहकांनीच या योजनेचा लाभ घेतला.

औरंगाबाद : कृषी पंपाकडे असलेल्या वीज बिलाची थकबाकी टप्प्याटप्प्याने भरण्यासाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेंतर्गत ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती; परंतु परिमंडळांतर्गत औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील ३ लाख ३२ हजार १० कृषीपंप ग्राहकांपैकी अवघ्या ३ हजार ९७७ ग्राहकांनीच या योजनेचा लाभ घेतला. उर्वरित ३ लाख २८ हजार ३३ ग्राहकांनी या योजनेकडे पाठ फिरवल्याची माहिती समोर आली आहे. 

महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळांतर्गत या जिल्ह्यात २ लाख १३ हजार १६७ कृषीपंपांचे ग्राहक असून, त्यांच्याकडे १३६६.८८ कोटी रुपये एवढी थकबाकी आहे. जालना जिल्ह्यातील १ लाख १८ हजार ८४३ कृषीपंप ग्राहकांकडे ९५१.८० कोटी रुपयांची मूळ थकबाकी आहे. राज्य शासनाने कृषीपंपधारक शेतकर्‍यांना बिलांच्या अदायगीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी ही योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत ज्या शेतकर्‍यांकडे ३० हजार रुपयांपर्यंत बिलाची मूळ रक्कम थकबाकी आहे, अशा शेतकर्‍यांनी ५ हप्त्यांमध्ये, तर ज्यांच्याकडे ३० हजारापेक्षा अधिक बिल थकलेले असेल, त्यांनी १० हप्त्यांत मूळ रक्कम भरायची होती. यासाठी ३० नोव्हेंबर ही अंतिम मुदत होती; परंतु या योजनेला शेतकर्‍यांकडून अतिशय कमी प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे १ जानेवारीपासून कृषीपंप ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. याशिवाय नादुरुस्त रोहित्र (डीपी) बदलण्यासाठी महावितरणने त्या परिसरातील ७० टक्के कृषीपंपांना कपॅसिटर बसविल्याशिवाय ते दुरुस्त केले जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. 

दरमहा ० ते ३० युनिट एवढीच रीडिंग असलेले घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक ग्राहकांची संख्या शहरात ३१,४३८, जिल्ह्यातील ग्रामीण भागात १,४८,०१० आणि जालना जिल्ह्यात ४७,९०८ एवढी आहे. महावितरणने प्रामुख्याने या ग्राहकांचे मीटर तपासणे, घरातील विद्युतभार तपासणे, थकबाकी वसूल करणे, विद्युत पुरवठा खंडित करण्याची विशेष मोहीम सुरू केली आहे. या ग्राहकांचे मीटर बदलण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. 

३५ हजार आधुनिक मीटर या संदर्भात महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी पत्रकारांना सांगितले की, सध्या ३५ हजार आधुनिक मीटर प्राप्त झाले असून, या मीटरवर रिमोट अथवा अन्य छेडछाडीचा परिणाम होत नाही. आणखी ३५ हजार मीटर येणार आहेत. संशयास्पद अथवा कमी रीडिंग असलेले मीटर बदलून तेथे हे मीटर बसविण्याची कार्यवाही केली जाणार आहे. ज्यामुळे वीज गळती कमी होऊ शकेल.

टॅग्स :mahavitaranमहावितरणFarmerशेतकरी