शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
4
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
5
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
6
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
7
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
8
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
9
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
10
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
11
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
12
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
13
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
14
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
15
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
16
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
17
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
18
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
19
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
20
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

प्रमोशन नको, क्रिम पोस्टच हवी! राज्यातील ७५ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी एसीपी प्रमोशन नाकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 14:03 IST

अशांची तीन वर्षे पदोन्नती करू नका, अपर पोलिस महासंचालकांचे आदेश, अन्य लाभही काढून घेण्याच्या हालचाली

छत्रपती संभाजीनगर : पदोन्नती नसली तरी चालेल, पण आम्हाला ''''क्रीम पोस्ट'''' वर राहू द्या, अशी अप्रत्यक्ष भूमिका घेत राज्यातील ७५ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी विभागाअंतर्गत एसीपीसारख्या वरिष्ठ पदाच्या पदोन्नतीला थेट नकार देत पोलिस खात्यातील ''''बेशिस्तीपणाच्या हट्टा''''चा नवा अध्यायच लिहिला आहे. परंतु, अशा निरीक्षकांना पुन्हा पुढील तीन वर्षे या पदोन्नतीसह त्याच्या अन्य शासकीय लाभास अपात्र ठरविण्याचे आदेश महासंचालक कार्यालयाने जारी केले.

पोलिस विभागात ठरावीक सेवा वर्षे, कामगिरीचा अहवालानंतर अंमलदार, अधिकारी पदोन्नतीसाठी पात्र ठरतात. अंमलदार ते आयपीएस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी शासनातर्फे ठरावीक कालावधी व कामाच्या अनुभवांच्या वर्षांचे निकष ठरवले आहेत. सामान्यत: ८ ते १० वर्षे पोलिस निरीक्षकपदाच़ी सेवा बजावल्यानंतर विभागाअंतर्गत सहायक पोलिस आयुक्त पदाच्या पदोन्नतीस पात्र ठरतात. यंदा राज्यातील अशा ७५ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी थेट या नियमाला बगल दिली आहे. अशा निरीक्षकांवर योग्य कार्यवाही करावी. कार्यवाही न झाल्यास घटकप्रमुखाला जबाबदार धरले जाईल, असे आदेश राज्याचे अपर पोलिस महासंचालक डॉ. सुखविंदर सिंह यांनी दिले.

मोह न सुटणाऱ्यांत मुंबईचे सर्वाधिकअनेकदा पदोन्नतीसोबत होणारी बदली, पदामुळे मिळणाऱ्या अन्य आर्थिक फायद्यांमुळे अनेकदा पोलिस अधिकारी पदोन्नती नाकारतात. निरीक्षकपदाचा मोह न सुटणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये सर्वाधिक मुंबईचे २३, पुण्याचे ९, नवी मुंबईचे ६, पिंपरी चिंचवडचे ३, ठाण्याचे ९, तर छत्रपती संभाजीनगर शहराचे २ व जिल्ह्याच्या एका निरीक्षकाचा समावेश आहे.

मग तीन वर्षे अपात्र-एकदा एसीपी पदोन्नती नाकारणाऱ्या अधिकाऱ्यांना पुढील तीन वर्षे पदोन्नती यादीतून वगळले जाईल. नंतरही पात्रतेचा आढावा घेऊनच पदोन्नतीचा निर्णय होईल.-दुसऱ्यांदा नकार दिल्यास आणखी दोन यादींमधून वगळले जाईल. कायमचा नकार दिल्यास अधिकाऱ्याला भविष्यात विचारात घेण्यास मनाई केली जाईल.-पदोन्नतीसोबतच एसीपी पदाला असणारे लाभ, सेवेनिहाय पगाराच्या (श्युअर्ड करिअर प्रोग्रेस स्कीम -एसीपीएस) पात्रतेतूनदेखील वगळण्याचा कठोर निर्णय घेण्यात आला आहे.-नकार अधिकृतपणे नोंदवले जाऊन कार्यवाही होईल.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी