सपाकडून आघाडीबाबत सकारात्मक प्रतिसाद नाही : शिवपाल

By | Updated: December 4, 2020 04:12 IST2020-12-04T04:12:36+5:302020-12-04T04:12:36+5:30

लखनौ : उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीकडून आघाडी करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न मिळणे दुर्भाग्यपूर्ण आहे, असे प्रगतिशील समाजवादी पार्टी—लोहिया (प्रसपा) ...

No positive response from SP regarding lead: Shivpal | सपाकडून आघाडीबाबत सकारात्मक प्रतिसाद नाही : शिवपाल

सपाकडून आघाडीबाबत सकारात्मक प्रतिसाद नाही : शिवपाल

लखनौ : उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीकडून आघाडी करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न मिळणे दुर्भाग्यपूर्ण आहे, असे प्रगतिशील समाजवादी पार्टी—लोहिया (प्रसपा) प्रमुख शिवपाल सिंह यांनी म्हटले आहे.

शिवपाल यांनी म्हटले आहे की, समाजवादी पार्टीने आतापर्यंत माझ्या प्रस्तावावर कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही किंवा त्या पक्षाच्या नेतृत्वाशी कसलीही चर्चा झालेली नाही. माझी इच्छा असूनही चर्चा पुढे सरकत नाही, हे दुर्भाग्यपूर्ण आहे.

समाजवादी पार्टीपासून वेगळे होऊन प्रसपाची स्थापना करणाऱ्या शिवपाल यांनी यापूर्वी अनेकदा सपाशी आघाडी करण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यानंतर सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही म्हटले होते की, प्रसपा त्यांच्याबरोबर आली तर त्यांच्या नेत्याला कॅबिनेट मंत्रिपद दिले जाईल. आम्हाला प्रसपाशी आघाडी करण्यात कोणतीही अडचण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

शिवपाल यांनी स्पष्ट केले आहे की, आघाडी केली तरी प्रसपाचे स्वतंत्र अस्तित्व कायम राहील. या पक्षाचे एकांगी विलीनीकरण करण्याचा प्रस्तावही त्यांनी फेटाळून लावला आहे. प्रसपा आपले पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वास देऊ इच्छिते की, त्यांच्या सन्मानाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

आम्ही पक्षसंघटन मजबूत करण्यावर सतत काम करीत आहोत. येत्या २४ डिसेंबर रोजी प्रसपा संपूर्ण उत्तर प्रदेशातील प्रत्येक गावात पदयात्रांचे आयोजन करीत आहे. प्रत्येक गावात पोहोचणे व पक्षाचे विचार जनतेपर्यंत घेऊन जाणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे, असेही त्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टी तसेच शिवपाल यांच्या प्रगतिशील समाजवादी पार्टी—लोहिया (प्रसपा)ने तयारी सुरू केली आहे.

.................

गैरभाजप पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन

प्रगतिशील समाजवादी पार्टी—लोहिया (प्रसपा) प्रमुख शिवपाल सिंह यांनी म्हटले आहे की, गैरभाजप पक्षांनी एकत्र येण्याचे मी पुन्हा एकदा आवाहन करीत आहे. वेगवेगळ्या माध्यमांतून व संवादाच्या विविध व्यासपीठांवरून मी अनेकदा ही बाब सांगितलेली आहे की, समाजवादी विचारधारा असलेल्यांनी एका व्यासपीठावर यावे व सर्वांचा सन्मान होईल तसेच राज्याचा विकास होईल, असे काम करावे.

Web Title: No positive response from SP regarding lead: Shivpal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.