न. पा. निवडणुका डिसेंबरमध्ये

By Admin | Updated: February 17, 2016 00:44 IST2016-02-16T23:53:26+5:302016-02-17T00:44:07+5:30

औरंगाबाद : मराठवाड्यातील ५३ पैकी ४८ नगरपालिकांची मुदत डिसेंबर २०१६ मध्ये संपत असल्याने त्या नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी विभागीय प्रशासनाने सुरू केली आहे

No Pa Elections in December | न. पा. निवडणुका डिसेंबरमध्ये

न. पा. निवडणुका डिसेंबरमध्ये

औरंगाबाद : मराठवाड्यातील ५३ पैकी ४८ नगरपालिकांची मुदत डिसेंबर २०१६ मध्ये संपत असल्याने त्या नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी विभागीय प्रशासनाने सुरू केली आहे. या निवडणुकांसाठी २०११ ची जनगणना गृहीत धरून वॉर्ड रचना केली जाणार असल्यामुळे नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. विभागातील ४० नगरपालिकांची मुदत डिसेंबर २०१६ मध्ये तर ८ नगरपालिकांची मुदत फेब्रुवारी २०१७ मध्ये संपणार आहे. त्यामुळे तेथे मुदतीपूर्वीच निवडणुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विभागीय पातळीवरून जिल्हा प्रशासनाला निवडणुकांची तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. डिसेंबरमध्ये औरंगाबाद, कन्नड, गंगापूर, वैजापूर, पैठण, खुलताबाद, जालना-जालना, अंबड, परतूर, भोकरदन, नांदेड-माहूर, अर्धापूर, उमरी, धर्माबाद, हदगाव, हिंगोली-हिंगोली वसमत, कळमनुरी, उस्मानाबाद-उस्मानाबाद, तुळजापूर, नळदुर्ग, उमरगा, परंडा, भूम, कळंब, मरुम, बीड-बीड, अंबाजोगाई, परळी वैजनाथ, माजलगाव, गेवराई, धारूर, लातूर - उदगीर, निलंगा (नोव्हेंबर २०१६), औसा, परभणी - पूर्णा, मानवत, पाथरी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड व सेलू नगरपालिकांमध्ये निवडणुका होणार आहेत, तर खुलताबाद, नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, कुंडलवाडी, बिलोली, कंधार, देगलूर, मुखेड व लातूर जिल्ह्यांतील अहमदपूर नगरपालिकेची मुदत फेब्रुवारी २०१७ मध्ये संपणार आहे. या निवडणुका फेब्रुवारीमध्ये होतील.

Web Title: No Pa Elections in December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.