मंदीराला कुठलीही जमीन दान दिली नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:29 IST2020-12-17T04:29:40+5:302020-12-17T04:29:40+5:30
खुलताबाद : विरमगाव येथील शिवसंगमेश्वर मंदिराबाबत माझ्यावर करण्यात आलेले आरोप मला राजकीय जीवनात बदनाम करण्याचे विरोधकांचे षडयंत्र आहे. आमच्या ...

मंदीराला कुठलीही जमीन दान दिली नाही
खुलताबाद : विरमगाव येथील शिवसंगमेश्वर मंदिराबाबत माझ्यावर करण्यात आलेले आरोप मला राजकीय जीवनात बदनाम करण्याचे विरोधकांचे षडयंत्र आहे. आमच्या कुंटूबियांनी कुठलीही जमीन मंदीराला दिली नसल्याची माहिती खुलताबाद पंचायत समितीचे सभापती गणेश आधाने यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली. मंदिरावर अतिक्रमण करून ताबा घेत लाखो रूपयाचा गैरव्यवहार केल्याचा आरोप रविवारी भास्कर आधाने यांनी सभापती आधाने यांच्यावर केला होता.
खुलताबाद तालुक्यातील विरमगाव येथील शिवसंगमेश्वर महादेव मंदीराचा कुठलाही रस्ता आम्ही बंद केला नाही. आजही दररोज येथे पुजा सुरू असल्याचा दावा सभापती आधाने यांनी केला. उलट भास्कर आधाने व राजू आधाने यांचाच मंदिरावर ताबा घेण्याचा प्रयत्न आहे. मंदीराच्या जमिनीवर त्यांचा डोळा असून राजकीय दृष्ट्या मला बदनाम करण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे. आमचा मंदिरात कुठलाही हस्तक्षेप नाही. यासह मंदिराला आम्ही कुठलीही जमिन दिलेली नाही. भास्कर व राजू आधाने हे जन्मापासून औरंगाबादेत राहत असून गावात तेढ निर्माण करू पाहत आहे. गावाची बदनामी होऊ नये म्हणून मी आतापर्यंत शांत बसलो होतो. मंदिराच्या नावावर लाखो रूपये जमा केल्याचा आरोप खोटा असून मंदिराचा व्यवहार गावातील इती लोकच बघतात, असे सभापती आधाने यांनी स्पष्ट केले. यावेळी रमेश आधाने, नानासाहेब आधाने, गवनाची आधाने, शंकर आधाने, दत्तात्रय आधाने, सांडू आधाने आदी उपस्थित होते.
---- कॅप्शन : विरमगावच्या मंदिरात नियमित भाविक येत असल्याचा हा फोटो सभापती आधाने यांनी दिला आहे.