शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

जलवाहिनीची हायड्रोलिक चाचणी नाही; गुणवत्ता तपासणीलाही मजीप्राकडून बगल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 20:21 IST

जलवाहिनी टाकण्यापूर्वी पाइपची गुणवत्ता तपासण्यात आली होती का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मागील वर्षी अत्यंत घाईघाईत ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकली. नागरिकांना पाणी देणे गरजेचे आहे, हे कारण दाखवत जलवाहिनी सुरू केली. अवघ्या सहा महिन्यांतच चार वेळेस जलवाहिनीचे पाइप किती निकृष्ट दर्जाचे आहेत, हे उघडकीस येत आहे. मजीप्रा अधिकारी, कंत्राटदारांनी जलवाहिनीची हायड्रोलिक चाचणी घेतली असती तर जलवाहिनी पाण्याचा दाब किती सहन करू शकते, हे उघड झाले असते.

शहराला सध्या दोन जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा होतोय. १९७३-७४ मध्ये ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी जायकवाडी ते फारोळ्यापर्यंत टाकण्यात आली. दुसरी १२०० मिमी व्यासाची जलवाहिनी १९८२-८३ मध्ये टाकली. या दोन्ही जलवाहिन्यांचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केले. त्यांचा दांडगा अनुभव लक्षात घेऊन तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी २०० कोटी रुपये खर्च करून तातडीने ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकायला लावली. यातून ७५ एमएलडी पाणी अपेक्षित आहे. सध्या जलवाहिनीतून जेमतेम १० ते १२ एमएलडी पाणी येत आहे. रविवारी या जलवाहिनीला धनगाव येथे चक्क भगदाड पडले.

क्रॉस कनेक्शनचा प्रयोग१) मागील वर्षी जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाल्यावर शहराला पाणी देण्यासाठी मजीप्राने ९०० आणि १२०० मिमी जलवाहिनीला क्रॉस कनेक्शन दिले.२) १२०० मिमीची जुनी जलवाहिनी प्रेशर सहन करू शकली नाही. अनेक ठिकाणी ती फुटली. हा प्रयोग अयशस्वी झाला.३) बिंग फुटू नये म्हणून हायड्रोलिक चाचणीला बगल देत एका पंपावर जलवाहिनी सुरू केली. शेवटी ती फुटलीच.

गुणवत्तेची तपासणी नाहीजलवाहिनी टाकण्यापूर्वी पाइपची गुणवत्ता तपासण्यात आली होती का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. गुणवत्ता तपासली असती तर सहा महिन्यांत जलवाहिनीला भगदाड पडलेच नसते. या प्रकरणात मजीप्रा अधिकाऱ्यांची अक्षम्य चूक असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

...म्हणे सर्ज टँक नाहीजलवाहिनीवरील पंप बंद पडल्यावर रिव्हर्स येणाऱ्या पाण्याच्या प्रेशरने ती फुटल्याचे मजीप्रा अधिकारी मनपाला सांगत आहेत. सर्ज टँक असते तर असे झाले नसते, असेही त्यांचे म्हणणे आहे. मग मजीप्रानेच टाकलेल्या ७०० आणि १२०० मिमीच्या जलवाहिनीवर सर्ज टँक का नाहीत. ४५ वर्षांपासून या जलवाहिन्या सर्ज टँकविना सुरू आहेत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWaterपाणी