शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचावर अविश्वास ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:47 IST

वसमत तालुक्यातील हट्टा येथील सरपंच सविता किरण देशमुख यांच्यावर १४ ग्रामपंचायत सदस्यांनी वसमत तहसीलदार उमाकांत पारधी यांच्याकडे सोमवारी १४ आॅगस्ट रोजी अविश्वास ठराव दाखल केला

लोकमत न्यूज नेटवर्कहट्टा : वसमत तालुक्यातील हट्टा येथील सरपंच सविता किरण देशमुख यांच्यावर १४ ग्रामपंचायत सदस्यांनी वसमत तहसीलदार उमाकांत पारधी यांच्याकडे सोमवारी १४ आॅगस्ट रोजी अविश्वास ठराव दाखल केला. दोन वर्षापूर्वी सरपंच यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती.दोन वर्षे पूर्ण होण्याअगोदरच १७ पैकी १४ सदस्यांनी सरपंचावर अविश्वास ठराव दाखल केला. १९ आॅगस्ट रोजी हट्टा ग्रामपंचायत येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून, अविश्वास ठरावावर उपसरपंच सोमनाथ शेळके, ग्रा.पं.सदस्या लीलाबाई देशमुख, लताबाई देशमुख, संघमित्रा दिपके, सुरेखा जाधव, पार्वतीबाई पवार, ताहेराबी शेख, गजानन वानेरे, प्रल्हाद शिंदे, शेख खालेद, शेख अकबर, समद कुरेशी, रतन ढगे, रतन खाडे यांच्या अविश्वास ठरारावर सह्या आहेत. १९ आॅगस्ट रोजी विशेष सभेकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचावर १४ सदस्यांनी अचानक अविश्वास ठराव दाखल केल्यामुळे खळबळ उडाली असून, हट्टा सरपंचाने दोन वर्षांच्या काळात विकास कामे केली नसल्याची चर्चा ग्रामपंचायत सदस्य करीत आहे. तसेच दोन वर्षापूर्वी ‘सच का साथ’ घेऊन ही विकास झाला नाही. दोन वर्षाच्या काळात गावातील विकास कामे झाली नाही. ऐन दुष्काळी परिस्थितीत लाखों रुपये पाण्याच्या योजनेसाठी खर्च झाला; परंतु अखेर टँकरनेच पाणी पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. मागील काही वर्षांपासून हट्टा ग्रा.पं.ला अनेक ग्रामविकास अधिकारी लाभले. त्यांनी ‘सच का साथ अपना विकास’ करण्याची चर्चा ग्रा.पं.सदस्य, ग्रामस्थ करीत आहेत. १९ आॅगस्ट रोजी अविश्वास ठरावाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले असून, सदस्यांनी सध्या तरी मौन पाळलेले दिसून येत आहेत. शिवाय याबाबत गावामध्ये एकच चर्चा रंगत असल्याचे चित्र आहे.