शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

‘मनपा नको, सातारा नगर परिषदच हवी’

By admin | Updated: May 26, 2015 00:52 IST

औरंगाबाद : सातारा- देवळाई नगर परिषदेचा महापालिकेत समावेश करण्यात आला आहे; परंतु हा निर्णय रद्द करण्यात यावा आणि नगर परिषदच कायम ठेवण्यात यावी,

औरंगाबाद : सातारा- देवळाई नगर परिषदेचा महापालिकेत समावेश करण्यात आला आहे; परंतु हा निर्णय रद्द करण्यात यावा आणि नगर परिषदच कायम ठेवण्यात यावी, या मागणीसाठी जोरदार घोषणा देत विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच सातारा- देवळाईवासीयांतर्फे सोमवारी बीड बायपासवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे बीड बायपासवर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्याने बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली.‘आधी शहरातील लोकांना सुविधा पुरवा, मग आमचा विचार करा’, ‘नगर परिषद आमच्या हक्काची’ आंदोलकांनी दिलेल्या अशा घोषणांनी बीड बायपास रोड दणाणून गेला. भर उन्हात आंदोलनात महिला वर्गाचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला. प्रारंभी, जोरदार घोषणा देत आंदोलकांनी वाहतूक थांबवली. त्यामुळे बीड बायपासवरील दोन्ही बाजूंनी (पान २ वर)(पान १ वरून)वाहनांच्या रांगा लागल्या. आंदोलनकर्ते बाजूला झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होत असताना पुन्हा रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु पोलिसांनी आंदोलकांना अडविले. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला. आंदोलनात जावेद पटेल, बाळासाहेब गायकवाड, डॉ. सुदर्शन मुंडे, स्वप्नील, शिरसाट, गजेंद्रसिंग राठोड, रोहन पवार, क्षितिज रोडे, अंकुश दाभाडे, दीपक गायकवाड, अजय चव्हाण, शरद शेवाळे, बाजीराव हिवाळे, अप्पासाहेब शिंदे, विकास कवडे, रुख्मिणी मोगल, रिमन जाधव, शोभा पवार, संध्या गायकवाड, संजीवनी हिवाळे, शेख जिया, शेख अकबर पटेल, सुवर्णा पाटील, नलिनी शेवाळे आदी सहभागी झाले.जनतेच्या भावनेचा कोणत्याही प्रकारे विचार न करता नगर परिषदेचा महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय शासनाने घेतला. महापालिकेत समाविष्ट झालेल्या यापूर्वीच्या गावांचा कोणत्याही प्रकारे विकास झालेला नाही.महापालिकेत गेल्यानंतर मिळणारे पाणीही बंद झाले. त्यामुळे महापालिकेत समावेश झाल्याने सातारा- देवळाईचीही अशीच अवस्था होणार असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते.