मनपा शाळांचे होणार सर्वेक्षण

By Admin | Updated: May 19, 2014 00:17 IST2014-05-19T00:09:14+5:302014-05-19T00:17:55+5:30

नांदेड : आरटीई - २००९ नुसार परिसरातील ६ ते १४ वयोगटातील मुला- मुलींना प्रवेश देणे अनिवार्य आहे़ त्यासाठी शिक्षकांच्या सहकार्याने शालेय परिसरात सर्वेक्षण सुरू करण्याचे

NMC polls survey | मनपा शाळांचे होणार सर्वेक्षण

मनपा शाळांचे होणार सर्वेक्षण

नांदेड : आरटीई - २००९ नुसार परिसरातील ६ ते १४ वयोगटातील मुला- मुलींना प्रवेश देणे अनिवार्य आहे़ त्यासाठी शिक्षकांच्या सहकार्याने शालेय परिसरात सर्वेक्षण सुरू करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी भागवत जोशी यांनी संबंधितांना दिले आहेत़ मनपाच्या शाळेत ई - लर्निंग सुरू होत असल्याने जास्तीत जास्त मुलांना प्रवेश देण्यासाठी ही मोहिम हाती घेण्यात आली आहे़ शाळा व्यवस्थापन स्तरावर जाहीरात करून डिजीटल फलक लावून, गृह भेटीद्वारे प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या आहेत़ या कामात दुर्लक्ष करणार्‍यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी जोशी यांनी सांगितल़े़ खाजगी शाळांच्या स्पर्धेत उतरून गुणवत्ता वाढीचा संकल्प हाती घेतलेल्या महापालिकेच्या शाळा हाऊसफुल करण्यासाठी यंदा ई - लर्निंग शाळांची सुरूवात होत आहे़ गतवर्षी चार शाळांचे प्रवेश हाऊसफुल झाले होते़ एकूण अडीच हजार विद्यार्थी मनपा शाळेत शिक्षण घेत होते़ आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलां- मुलींच्या शिक्षणाचा आधार ठरलेल्या महापालिकेच्या शाळेच्या प्रवेशद्वारावर प्रवेश बंद झाल्याचे फलक लावण्यात आले होते़ मात्र यावर्षी मनपाच्या सर्वच शाळेतील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत़ शहरात महापालिकेच्या एकूण १७ शाळा असून २ हजार ४३७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़ यामध्ये १ हजार ३२२ मराठी तर १ हजार ११५ उर्दू माध्यमांचे विद्यार्थी आहेत़ मागील वर्षी वजिराबाद येथील शाळेत ३५४, गणेशनगर ११३, विष्णूनगर मराठी शाळेत १८५ व उर्दू शाळेत २८, जंगमवाडी प्राथमिक शाळेत २१२, उर्दू ११०, तर माध्यमिक शाळेत १३३, लेबर कॉलनी मराठी शाळेत १०६ व उर्दू ५७, स्वातंत्र्य सैनिनक कॉलनी २९, आंबेडकरनगर ९५, भीमसंदेश कॉलनी ८८, खय्युमप्लॉट उर्दू ३४५ तर माध्यमिक १५७, हैदरबाग ६६, महेबुबिया कॉलनी १८१, इस्लामपूरा ९३, किल्ला ३७ व ब्रह्मपुरी शाळेत ४१ विद्यार्थी शिक्षण घेत होते़ सिडको येथील शाळेचे स्थलांतर करण्याचा प्रयत्न झाल्याने या शाळेत विद्यार्थी संख्या घटली़ तर स्वातंत्र्य सैनिक कॉलनीत दोन वर्षापूर्वी केवळ ७ विद्यार्थ्यांचे प्रवेश होते़ मागील वर्षी ही संख्या २९ वर गेली होती़ मनपाच्या सर्वच माध्यमिक शाळांच्या प्रवेशाची सरासरी ५० टक्के एवढी आहे़ मनपा शाळेतील शिक्षकांच्या मान्य पदांची संख्या ८४ आहे़ त्यापैकी ७१ शिक्षक कार्यरत आहेत़ माध्यमिक शाळेत १० पदांपैकी २ जागा रिक्त आहेत़ तर उर्दू माध्यमांसााठी ३ जागा रिक्त आहेत़ यावर्षी ई - लर्निंग उपक्रमांसोबतच सेमी इंग्रजी अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे़ यासाठी उपलब्ध शिक्षकांनाच प्रशिक्षण देण्यात येत आहे़ (प्रतिनिधी) मनपा शाळेचा नंदीग्राम मैत्र उपक्रम मनपा आयुक्त जी़ श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी भागवत जोशी यांनी मागील वर्षी महापालिकेच्या काही शाळेत नंदीग्राम मैत्र उपक्रम हाती घेतला होता़ यंदाही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे़ हा उपक्रम विद्यार्थी केंद्रीत व स्वयं अध्ययनावर आधारित होता़ अध्ययना बद्दलची भिती दूर करून अध्ययन प्रक्रिया नियमित, सहज व सरळ बनवणे हा उद्देश या उपक्रमाचा आहे़ गट पद्धतीचा अवलंब करून एका हुशार विद्यार्थ्याची गट प्रमुख म्हणून नियुक्ती करून या विद्यार्थ्यास निमशिक्षकाची जबाबदारी देण्यात येते़ स्वत:च्या अभ्यासासोबतच तो इतरांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करतो़वर्ग शिक्षकाच्या सूचनेनुसार गट प्रमुखास एका महिन्याचे नियोजन देण्यात येते़ त्यानुसार गट प्रमुख आपल्या तीन मित्रांना स्वत: प्राप्त केलेल्या कौशल्याचे धडे देईल़ या शिवाय टोकन रिवार्ड बोर्ड हा उपक्रमही राबविण्यात येणार आहे़

Web Title: NMC polls survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.