प्राचार्यांची निष्काळजी विद्यार्थ्यांना भोवली !
By Admin | Updated: August 10, 2014 02:22 IST2014-08-10T02:19:21+5:302014-08-10T02:22:04+5:30
लातूर : अनुसुचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेतून

प्राचार्यांची निष्काळजी विद्यार्थ्यांना भोवली !
लातूर : अनुसुचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेतून शिष्यवृत्ती दिली जाते़ शैक्षणिक वर्ष २०१३-१४ मध्ये लातूर जिल्ह्यातील २३ महाविद्यालयातील जवळपास १ हजार ८८ विद्यार्थ्यांना प्राचार्यांच्या निष्काळजीपणामुळे शिष्यवृत्तीपासून वंचित रहावे लागले आहे़ समाज कल्याण विभागाने संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना वारंवार सूचना देऊनही परिपूर्ण माहिती भरली नाही़ प्रशासनाने आपली जबाबदारी पार पाडली असली तरी महाविद्यालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे़ शैक्षणिक वर्ष २०११-१२ पासून आॅनलाईन पध्दतीने समाज कल्याण विभागाकडून शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येत आहे़ शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर व शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या खात्यावर आॅनलाईन वर्ग करण्यात येत आहे़ शैक्षणिक वर्ष २०१३-१४ मध्ये लातूर जिल्ह्यातील ४५६ महाविद्यालयातील ४१ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन अर्ज भरले होते़ यापैकी ३९ हजार ७६१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली होती़ मात्र, जिल्ह्यातील २३ महाविद्यालयातील १ हजार ८८ विद्यार्थी प्राचार्यांच्या निष्काळजीपणामुळे शिष्यवृत्तीपासून वंचित राहिली आहेत़ याप्रकरणी समाजकल्याण विभागाने महाविद्यायाच्या प्राचार्यांना वारंवार सूचना देवूनही तसेच लेखी कळवूनही परिपूर्ण अर्ज सादर केले नाहीत़ त्यामुळे भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण, परिक्षा शुल्क योजनेपासून लाभार्थी वंचित राहिले आहेत़ (प्रतिनिधी) लातूर येथील दयानंद महाविद्यालय १५९, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय ८६, राजर्षी शाहू महाविद्यालय १०६, श्री साई सायन्स कॉलेज १६, श्री़ व्ही़डी़देशमुख पॉलिटेक्निक ८४, दयानंद कॉलेज आॅफ आर्टस ११, शासकीय तंत्र प्रशाला २६, पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन १२, जीआरएम ज्युनिअर कॉलेज १४, श्री देशिकेंद्र उच्च माध्यमिक विद्यालय ११, एम़एस़बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे १४ विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत़ उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय १२०, श्री हावगीस्वामी महाविद्यालय ४८, लोणी येथील कॉलेज आॅफ फुड टेक्नॉलॉजी ९६, नालंदा दुग्धोत्पादन विद्यालय ३५, अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालयाचे १३, पु़अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय ६०, अजिम कनिष्ठ महाविद्यालय (औसा)-१८, डी़बी़ ईन्सिट्युट आॅफ मॅनेजमेंट रिसर्च (महाळंग्रा)-९८, चाकूर येथील संजीवनी महाविद्यालय १७, भाई किसनराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय १२, निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथील लोकमान्य उच्च माध्यमिक विद्यालयाचे ११ विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहेत़