नऊ गाळ्यांना पालिकेने ठोकले सील
By Admin | Updated: March 25, 2017 22:55 IST2017-03-25T22:52:11+5:302017-03-25T22:55:16+5:30
उस्मानाबाद : येथील नगर पालिकेने विविध करापोटी थकीत रक्कमेची वसुली करण्यासाठी सक्तीची मोहीम हाती घेतली आहे़

नऊ गाळ्यांना पालिकेने ठोकले सील
उस्मानाबाद : येथील नगर पालिकेने विविध करापोटी थकीत रक्कमेची वसुली करण्यासाठी सक्तीची मोहीम हाती घेतली आहे़ याच अनुषंगाने शनिवारी सकाळीच पालिकेच्या पथकाने व्यापारी संकुलातील गाळेधारकांविरूध्द कारवाई मोहीम राबवून ९ गाळ्यांना सील ठोकले़ पालिकेच्या या आक्रमक कारवाईमुळे एकाच दिवसात तब्बल २१ लाख ३२ हजार रूपयांच्या कराची वसुली झाली आहे़
उस्मानाबाद नगर पालिकेने मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली आहे़ थकबाकीदारांना कराचा भरणा करण्यासाठी नोटीसा देण्यात आल्या असून, बड्या थकबाकीदारांना वॉरंटही बजावण्यात आले आहे़ तर थकबाकीदारांच्या नावाची यादी पालिकेच्या प्रवेशद्वारात डकविण्यात आली आहे़ विविध उपाय राबवूनही थकीत कराची वसुली होत नसल्याने नगर पालिकेचे मुख्याधिकारी मनोहरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी सकाळीच व्यापारी संकुलातील गाळे सील करण्याची मोहीम हाती घेतली़ शहरातील तुळजाभवानी व्यापारी संकूल व ताजमहल टॉकीजसमोरील संकुलातील जवळपास ९ गाळे सील केले़ पालिकेने आक्रमक भूमिका घेतल्याने दुकानदारांनी एकाच दिवशी तब्बल २१ लाख ३२ हजार रूपये करांचा भरणा केला आहे़ यात कोणी चेक दिला असून, कोणी रोखीने कराचा भरणा केल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले़ या कारवाईत मुख्याधिकाऱ्यांसह वसुली विभाग प्रमुख एऩव्हीक़ुलकर्णी, संभाजी राजे, संतोष गायकवाड, रवींद्र मोरे, मधुकर मोरे, अनिल तनमोर, राजा शेरकर आदींचा सहभाग होता़