निमजे यांनी मिळवला सुपर रँडोनियर्सचा किताब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:58 IST2019-03-04T00:58:30+5:302019-03-04T00:58:56+5:30
औरंगाबाद येथील सायकलपटू माधुरी निमजे यांनी चार महिन्यांत २००, ३००, ४०० आणि ६० कि.मी. सायकल चालवून नुकताच सुपर रँडोनियर्स किताब पटकावला आहे. अशी कामगिरी करणाऱ्या त्या औरंगाबादच्या पहिल्या सायकलपटू ठरल्या आहेत.

निमजे यांनी मिळवला सुपर रँडोनियर्सचा किताब
औरंगाबाद : औरंगाबाद येथील सायकलपटू माधुरी निमजे यांनी चार महिन्यांत २००, ३००, ४०० आणि ६० कि.मी. सायकल चालवून नुकताच सुपर रँडोनियर्स किताब पटकावला आहे. अशी कामगिरी करणाऱ्या त्या औरंगाबादच्या पहिल्या सायकलपटू ठरल्या आहेत.
३०० कि.मी. अंतराचा मार्ग हा औरंगाबाद, जालना, अहमदनगर व पुन्हा औरंगाबाद असा होता. त्याचप्रमाणे औरंगाबादच्या अनेकांनी या चार महिन्यांत २००, ३०० व १०० कि.मी. सायकल राईड केली आहे.
सायकल राईड करणारे सायकलपटू पुढीलप्रमाणे (२०० कि.मी.) : जयेश त्रिभुवन, गिरीश गोडबोले, परवेझ विराणी, मो. शाफे, ओमकार केसरकर, रवींद्र धामणगावकर, उमेश मारवडे, सतीश अन्वेकर, शुभम पाटील, हर्ष जाधव. ३०० कि.मी. : माधुरी निमजे (औरंगाबाद), विजय ठुबे (पुणे), गणेश माळी (नाशिक), एस. कार्तिक (पुणे), नीलेश झवर, सचिन शेटे, नीता सारंग (नाशिक), प्रभंजन भालेराव, भूषण कपाडिया, कृष्णा पोळ, सचिन कोरान्ने, यामिनी खैरनार (नाशिक), नितीन सोनगीरकर, केदार गोगटे (औरंगाबाद). १०० कि.मी. : जस्मीतसिंह सोधी, सागर तोल्वानी, शाम खटोड, मयूर वाकपंजार, सचिन इनामदार, विशाल बासरकर. या सायकल राईडचे आयोजन नितीन घोरपडे, अभिजित नारगोलकर यांनी केले.