निमीत गोयल नवे पोलीस अधीक्षक, मोक्षदा पाटील यांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 12:21 PM2021-09-10T12:21:53+5:302021-09-10T12:22:57+5:30

शहर पोलीस आयुक्तालयातील दोन उपायुक्तांच्या बदल्या

Nimit Goyal new Superintendent of Police, Mokshada Patil transfers | निमीत गोयल नवे पोलीस अधीक्षक, मोक्षदा पाटील यांची बदली

निमीत गोयल नवे पोलीस अधीक्षक, मोक्षदा पाटील यांची बदली

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस दलात मोठे फेरबदल 

औरंगाबाद : ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची लोहमार्ग पोलीस अधीक्षक, औरंगाबाद याठिकाणी बदली झाली आहे. त्यांच्या जागी मुंबई शहर पोलीस उपायुक्तपदी असणारे आयपीएस अधिकारी निमीत गोयल यांची नियुक्ती करण्यात आली. शहर पोलीस दलातील उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, मीना मकवाना यांचीही बदली करण्यात आली आहे.

राज्य शासनाने आयपीएस, पोलीस अधीक्षक, उपायुक्त, उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्त या पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी सायंकाळी काढले. आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची औरंगाबादेतील लोहमार्ग पोलीस अधीक्षकपदी बदली केली आहे. त्यांच्या जागी मुंबईत शहर पोलीस दलात उपायुक्त असणारे निमीत गोयल यांची पदस्थापना करण्यात आली. याशिवाय अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगल यांची पोलीस अधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक औरंगाबाद याठिकाणी, राज्य राखीव पोलीस बल, गट १३, नागपूर येथील समादेशक पवन बनसोड यांची औरंगाबाद ग्रामीणमध्ये अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांमध्ये शहर पोलीस दलातील उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांची पोलीस अधीक्षक, फाेर्स वन, यूसीटीसी, मुंबई आणि दुसऱ्या उपायुक्त मीना मकवाना यांची उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग औरंगाबाद येथे बदली झाली आहे. याशिवाय उस्मानाबादचे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांची पोलीस अधीक्षक दहशतवाद विरोधी पथक औरंगाबाद, औरंगाबाद लोहमार्ग पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर येथे प्राचार्य, नाशिक येथील अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिला घार्गे यांची औरंगाबाद गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे. याशिवाय राज्य गुप्तवार्ता विभाग औरंगाबाद येथील उपायुक्त उज्वला वानकर आणि नांदेड येथील नागरी हक्क संरक्षणच्या पोलीस अधीक्षक अपर्णा गिते यांची औरंगाबाद शहर पोलिसात उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

उपअधीक्षक पदावरील यांच्या झाल्या बदल्या
शहरातील सहायक पोलीस आयुक्त रवींद्र काळोखे यांची कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी उपविभागाच्या उपविभागीय अधिकारीपदी बदली झाली. चंद्रपूर येथील शिलवंत नांदेडकर यांची पोलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, औरंगाबाद, उस्मानाबाद येथील विशाल खांबे यांची अप्पर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, औरंगाबाद परिक्षेत्र, डॉ. विशाल नेहुल यांची उपविभागीय अधिकारी पैठण उपविभाग, गडचिरोली येथील जयदत्त भवर यांची उपविभागीय पोलीस अधिकारी, औरंगाबाद ग्रामीण, गंगापूर उपविभागाचे संदीप गावीत यांची पोलीस उपअधीक्षक जळगाव याठिकाणी बदली करण्यात आली आहे.

Web Title: Nimit Goyal new Superintendent of Police, Mokshada Patil transfers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.