कृत्रिम पावसासाठी रात्री उड्डाणाचा निर्णय अधांतरी
By Admin | Updated: August 31, 2015 13:02 IST2015-08-31T12:59:07+5:302015-08-31T13:02:34+5:30
कृत्रिम पावसासाठी रात्री क्लाऊड सिडिंगवर (सिल्व्हर एरोसोल्स फ्लेअर्स ढगांत फोडणे) विचार करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सुरू असलेली चर्चा थांबली आहे

कृत्रिम पावसासाठी रात्री उड्डाणाचा निर्णय अधांतरी
औरंगाबाद : कृत्रिम पावसासाठी रात्री क्लाऊड सिडिंगवर (सिल्व्हर एरोसोल्स फ्लेअर्स ढगांत फोडणे) विचार करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सुरू असलेली चर्चा थांबली आहे. मंत्र्यांच्या बैठकांमुळे त्यावर काहीही विचार होऊ शकला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. २0 ऑगस्टपासून पावसाळी ढगांची दिवसांऐवजी रात्री गर्दी होत आहे. त्यामुळे रात्री विमानाचे उड्डाण करण्याचा विचार पुढे आला. मात्र, अजून तरी रात्री विमानांचे उड्डाण करण्याबाबत निर्णय होऊ शकलेला नाही.
सध्या पावसासाठी विमान फ्लेअर्ससह उड्डाण घेत आहे. परंतु अपेक्षित असे यश येत नाही. रात्री फवारणी करणे शास्त्रोक्त असेल तर त्याचा विचार केला जाईल. कृत्रिम पाऊस ही संकल्पना वेगळी आहे. तो एक प्रयोग आहे. परंतु निसर्ग मराठवाड्यावर कृपा करील, अशी अपेक्षा सूत्रांनी वर्तविली. २२ जुलैपासून आजवर कृत्रिम पावसाच्या प्रयोगातून विशेष असे काही हाती लागलेले नाही. कृत्रिम पावसासाठी ढगांचा शोध घेण्यात सी डॉप्लर रडार गुंतले आहे. ■ विभागीय आयुक्तालयाने पाठविलेल्या अहवालानुसार २७ ऑगस्टपासून आजवर ६१ मि. मी. पाऊस झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
■ २६ ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्यातील काही परिसरात विमान गेले होते. तेथे ६ मि. मी. पाऊस झाला.
■ त्यानंतर २७ रोजी मलकापूर, शहापूर, गरडवाडी, पाथर्डी, शेवगाव तालुका परिसरात ४५ मि. मी. च्या आसपास कृत्रिम प्रयोगातून पाऊस झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. हा पाऊस १ ते १0 मि. मी. च्या दरम्यान झाला आहे. मि. मी. पावसाचा दावा