जिल्ह्यात ३१ जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:07 IST2021-01-08T04:07:42+5:302021-01-08T04:07:42+5:30
औरंगाबाद : ब्रिटनमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ५ जानेवारीपर्यंत लागू करण्यात ...

जिल्ह्यात ३१ जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी कायम
औरंगाबाद : ब्रिटनमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ५ जानेवारीपर्यंत लागू करण्यात आलेली संचारबंदी (कर्फ्यू) ३१ जानेवारीपर्यंत कायम राहणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. महापालिका हद्दीत २२ डिसेंबर २०२० पासून रात्रीच्या संचारबंदीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ग्रामीण भागातदेखील संचारबंदी राहणार आहे. रात्री १० वाजून ३० मिनिटानंतर जी हॉटेल्स, आस्थापने, दुकाने सुरू राहतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. १५ दिवसांसाठी असलेल्या रात्रीच्या संचारबंदीची मुदत ५ जानेवारी रोजी संपणार आहे.
जिल्ह्यात पोलीस आयुक्तांचे कार्यक्षेत्र वगळून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशान्वये लागू केलेले मनाई आदेश यापुढे ३१ जानेवारीपर्यंत लागू राहणार आहेत. पोलीस आयुक्तालय क्षेत्राबाबत पोलीस आयुक्तांचे आदेश अंमलात राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी चव्हाण यांनी जारी केले आहेत. कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी, त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व उपाययोजना करण्यासाठी मनपा आयुक्तांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे. तसेच मुख्य सचिवांच्या पत्रानुसार पालिका हद्दीतील बाजार, दुकानांच्या लॉकडाऊनबाबत मनपा आयुक्त निर्णय घेतील.