एनएचके संघ विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:58 IST2017-12-09T00:57:59+5:302017-12-09T00:58:41+5:30
औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक औद्योगिक टष्ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेत एनएचके संघाने आयजीटीआर संघावर, तर स्कोडा आॅटो संघाने जॉन्सन अॅण्ड जॉन्सन संघावर मात केली.

एनएचके संघ विजयी
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक औद्योगिक टष्ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेत एनएचके संघाने आयजीटीआर संघावर, तर स्कोडा आॅटो संघाने जॉन्सन अॅण्ड जॉन्सन संघावर मात केली. ऋषिकेश तरडे आणि विजय मेहेत्रे हे आज झालेल्या सामन्यात सामनावीर ठरले.
सकाळच्या सत्रात ऋषिकेश तरडेच्या ४९ चेंडूंतील ८ चौकार व एका षटकारासह फटकावलेल्या ७६ धावा आणि गौरव शिंदेच्या २ षटकार व ४ चौकारांसह ५३ धावांच्या बळावर एनएचके संघाने २0 षटकांत ४ बाद १८५ धावा ठोकल्या. राहुल यादवने २५ धावांचे योगदान दिले. आयजीटीआरकडून हुसेन अमोदीने २ व सुशील नाईक व दीपक जगताप यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
प्रत्युत्तरात आयजीटीआर संघ ८९ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून हुसेन अमोदीने २१ व सुशील नाईकने १९ धावा केल्या. एनएचकेकडून रोहन हंडीबाग, ऋषिकेश तरडे, अनिल भंवर व कैलास हजारे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
दुपारच्या सत्रात स्कोडा संघाने ६ बाद १६१ धावा केल्या. त्यांच्याकडून विजय मेहेत्रेने २0 चेंडूंत ६ चौकारांसह ३४, विपुल भोंडेने ३0, संदीप खोसरेने ३१ व पवन नवले याने २६ धावा केल्या. जॉन्सन अँड जॉन्सनकडून भास्कर जिवरगने ३ व सतीश भुजंगेने २ गडी बाद केले प्रत्युत्तरात जॉन्सन अँड जॉन्सन संघ ७१ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून भास्कर जिवरगने ३0 व अनिरुद्ध पुजारीने १९ धावा केल्या. स्कोडाकडून संदीप खोसरेने ३, तर योगेश भागवत, विजय मेहेत्रे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.