पाच पथके नेमूनही तपास सरकेना पुढे

By Admin | Updated: July 3, 2014 00:16 IST2014-07-02T23:21:49+5:302014-07-03T00:16:57+5:30

बीड: गेवराई येथील एका सात वर्षाच्या मुलीचा अर्धवट मृतदेह सापडून दोन दिवसांचा कालावधी उलटला तरी पोलिसांना सक्षम पुरावे हाती लागले नसल्या त्या चिमुकलीच्या खुनाचे रहस्य अद्यापही दडलेलेच आहे.

Next to the investigation by assigning five teams | पाच पथके नेमूनही तपास सरकेना पुढे

पाच पथके नेमूनही तपास सरकेना पुढे

बीड: गेवराई येथील एका सात वर्षाच्या मुलीचा अर्धवट मृतदेह सापडून दोन दिवसांचा कालावधी उलटला तरी पोलिसांना सक्षम पुरावे हाती लागले नसल्या त्या चिमुकलीच्या खुनाचे रहस्य अद्यापही दडलेलेच आहे.
गेवराईत झालेल्या या खुन प्रकरणाचा तपास लावण्यासाठी मंगळवारी पाच पथके स्थापन केली होती. पथकाने चौकशी करुन पाच जणांना ताब्यात घेत माहिती घेतली मात्र पोलिसांच्या हाती कोणतेही धागेदोरे लागले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्हा पोलिस अधीक्षक गृह दिनकर शिंदे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व इतर पोलिस अधिकारी तपास कामात गुंतले आहेत. पोलिसांनी तपासासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे.
पालकांनी घाबरुन जाऊ नये
गेवराई येथे झालेला प्रकार हा नरबळीचा प्रकार आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याने नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी पालकांना केले आहे. या प्रकरणाची कसून चौकशी सुरु असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Next to the investigation by assigning five teams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.