जिजामातानगरात दुसऱ्या दिवशी आली वीज

By Admin | Updated: June 13, 2017 23:46 IST2017-06-13T23:43:10+5:302017-06-13T23:46:38+5:30

हिंगोली : हिंगोलीतील जिजामातानगरातील समस्या सुटली

The next day in Jijamatanagar came the electricity | जिजामातानगरात दुसऱ्या दिवशी आली वीज

जिजामातानगरात दुसऱ्या दिवशी आली वीज

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आल्यानंतर त्यांनी आपला ९0४९४४४४४४ हा भ्रमणध्वनी क्रमांक देऊन वीज समस्या सुटत नसल्यास तात्काळ सोडविण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. त्यावर हिंगोलीतील जिजामातानगरातील काहींनी संपर्क साधल्यावर रात्र अंधारात जागून काढलेल्या जनतेची दुसऱ्या दिवशी समस्या सुटली.
हिंगोलीत मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे झालीच की नाही, हा शोधाचा विषय आहे. काही ठिकाणी थातूर-मातूर दुरुस्ती होते. मात्र डीपीवर कीट-कॅट नसणे, त्यावरील फांद्या, वेली न हटविणे हे जणू महावितरणच्या नियमातच असल्यासारखे आहे. त्याच्या तक्रारी करुनही काही फायदा होत नाही. मागच्या महिन्यात १७ मे रोजी तर चक्क ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचाच जनता दरबार झाला. त्यात त्यांनी स्वत:च भागिदारीत कंत्राटदारी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची भाषा केली होती. ती नुसती ‘इशारा’च होती की खरेच अशी चौकशी होतेय, याचा काहीच मागमूस नाही. मागील तीन-चार वर्षांत इन्फ्रासह विविध योजनांत तीनशे ते चारशे कोटींची कामे झाली. तरीही जिल्हा अनेकदा अंधारात राहण्याची नामुष्की ओढवली आहे. यामुळे कामाच्या दर्जावर शंका घ्यावी की, नवी कामे केल्यामुळेच समस्या वाढल्या, हे कळायला मार्ग नाही. हिंगोलीच्या इतिहासात कधी एवढा काळ वीज खंडित होत नसावी, जेवढा त्रास सध्या जनता सोसत आहे. बावनकुळे यांनी त्या खात्याचे मंत्री असूनही केलेला आरोप रास्त असेल तर मग खरोखरच सगळेच मुसळ केरात गेले आहे. पण त्या खात्याचा मंत्रीच हतबलता व्यक्त करू लागला असेल तर हिंगोलीकरांना या कचाट्यातून बाहेर काढणार कोण?

Web Title: The next day in Jijamatanagar came the electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.