दुसऱ्या दिवशी ७ अतिक्रमणे काढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 21:13 IST2019-06-04T21:13:39+5:302019-06-04T21:13:50+5:30
सिडको प्रशासनाने सुरु केलेली अतिक्रमण हटाव मोहिम दुसºया दिवशीही सुरुच होती. मंगळवारी गट नं. ४९ वरील ७ अतिक्रमणे हटवून भूखंड मोकळा केला. व जेसीबीच्या सहाय्याने सपाटीकरणाचे काम सुरु केले.

दुसऱ्या दिवशी ७ अतिक्रमणे काढली
वाळूज महानगर: सिडको प्रशासनाने सुरु केलेली अतिक्रमण हटाव मोहिम दुसºया दिवशीही सुरुच होती. मंगळवारी गट नं. ४९ वरील ७ अतिक्रमणे हटवून भूखंड मोकळा केला. व जेसीबीच्या सहाय्याने सपाटीकरणाचे काम सुरु केले.
सिडकोच्या मालकीच्या मोकळ्या जागेवर झालेले अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरु केली आहे. सोमवारी गट नंबर ४९ वरील जवळपास ३५ कच्ची अतिक्रमणे काढण्यात आली. मंगळवारी या भूखंडावरील उर्वरित ७ अतिक्रमणे काढून भूखंड मोकळा केला. अतिक्रमणे काढल्यानंतर भूखंडाचे सपाटीकरणाचे काम हाती घेण्यात आले.