नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:06 IST2021-06-09T04:06:34+5:302021-06-09T04:06:34+5:30
पैठण शहरातील उच्चभ्रू वसाहतीतील घटना : पैठण : शहरातील बालाजी विहार येथील नवविवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या..
पैठण शहरातील उच्चभ्रू वसाहतीतील घटना :
पैठण : शहरातील बालाजी विहार येथील नवविवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रगती सागर गाढवे (२२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
पैठण शहरातील बालाजी विहार या उच्चभ्रू वसाहतीत सागर गाढवे हे आपल्या पत्नीसह काही दिवसापूर्वी रहायला आले होते. २४ जून २०२० रोजी त्यांचा विवाह झाला होता. सागर पैठण औद्योगिक वसाहतीमधील अजिंठा फार्मा कंपनीमध्ये नोकरीला आहे. सोमवारी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान सागर गाढवे कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडला. सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान घरी परतला असता पत्नी प्रगती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. दरम्यान पोलीस निरीक्षक किशोर पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, रामकृष्ण सागडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. प्रगतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पोलिसांनी हलविला. याप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
-----
प्रगतीचा स्वभाव अबोल
सागर गाढवे हे मूळचे आस्तगाव ता. पारनेर येथील रहिवासी आहे. मयत प्रगतीचे माहेर पिंपरी गवळी, ता. पारनेर, जि. अहमदनगर येथील आहे. कुटुंबीयांच्या संमतीने त्यांचा विवाह झालेला होता. प्रगती अत्यंत अबोल होती, ती फारशी कुणाशी बोलत नव्हती. सकाळी घंटागाडीमध्ये कचरा टाकण्यासाठी ती घराबाहेर आली होती. त्यानंतर प्रगती दिसली नाही, असे अपार्टमेंटमधील महिलांनी सांगितले.