गुरव समाजातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:17 IST2021-02-05T04:17:10+5:302021-02-05T04:17:10+5:30
सिडको एन-७ अयोध्यानगरातील सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात माजी नगरसेविका ज्योती पिंजरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सत्कार समारंभास माजी ...

गुरव समाजातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार
सिडको एन-७ अयोध्यानगरातील सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात माजी नगरसेविका ज्योती पिंजरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सत्कार समारंभास माजी नगरसेवक अनिल जैस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती. ढासला ग्रामपंचायतीचे राम पाटील खरात, अण्णा कदम, बाबूराव गडगिळे, विजय पट्टेकर, शेख कदीर शेख जहीर, मदनसिंग डोभाळ, चरणसिंग डोभाळ व दीपक पाटील यांच्यासह वडोदबाजार ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या राणी शांताराम तोरणमल, विज्ञानेश्वर आपेगावच्या वैशाली अमोल ढोले, राजाराय टाकळीच्या सदस्या नंदा दांडगे व वेरूळचे कुणाल दांडगे यांच्या वतीने सुनील दांडगे यांचा फेटे बांधून, शाल, श्रीफळ, पुष्पहार व संत काशिबा महाराजांची प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला. या सर्वांनी नंतर मनोगते व्यक्त केली.
या समारंभात औरंगाबाद जिल्हा गुरव समाज महिला मंडळाची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. २०२१ -२२ या वर्षासाठी डॉ. जयश्री गणेश काळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी महिलांच्या व लहान मुलांच्या उखाणे स्पर्धा भजन गायन स्पर्धा रंगल्या. आगलावे आजीने गायलेले भारुड सर्वांच्या लक्षात राहिले. विठ्ठल रखुमाई व संत काशिबा महाराजांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. नियोजित सामूहिक विवाह, मौंजी व वधू-वर परिचय मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी मंडळाचे सरचिटणीस रामनाथ कापसे यांनी केले. मावळत्या अध्यक्षा मीना साळुंके व पदाधिकाऱ्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले व रवि साळुंके यांनी आभार मानले.