नववर्ष स्वागताची सांस्कृतिक परंपरा
By Admin | Updated: December 31, 2015 13:33 IST2015-12-31T13:33:00+5:302015-12-31T13:33:20+5:30
३0 सप्टेंबर १९९३ रोजी औसा तालुक्यात महाप्रलयंकारी भूकंप झाला. या भूकंपानंतर तालुक्यातील नागरिकांची मानसिकता ढासाळली.

नववर्ष स्वागताची सांस्कृतिक परंपरा
औसा : ३0 सप्टेंबर १९९३ रोजी औसा तालुक्यात महाप्रलयंकारी भूकंप झाला. या भूकंपानंतर तालुक्यातील नागरिकांची मानसिकता ढासाळली. या मानसिककेला उभारी मिळावी म्हणून ३१ डिसेंबर १९९३ रोजी मनोगत प्रतिष्ठानने औश्यात मनोगत कला महोत्सव आयोजित केला असून, २३ वर्षांपासून ही परंपरा आहे. ३१ डिसेंबर सायंकाळी ६ वाजता हा महोत्सव सुरू होतो अन् रात्री १२ वाजता या कार्यक्रमाची सांगता होते. गेल्या २३ वर्षापासून संयोजक राजू पाटील यांचा नववर्षाच्या स्वागताचा अन् मावळत्या वर्षाला निरोप देण्याचा ऐतिहासिक कार्यक्रम नित्यनेमाने सुरू आहे. ■ मनोगत प्रतिष्ठानच्या या मनोगत कला महोत्सवात प्रत्येक वर्षी ४0 संघ आणि १५0 कलाकार सहभागी होत असतात. या कला महोत्सवात लातूर जिल्हाच नाही तर मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, बीड, नांदेड, उस्मानाबाद तसेच पुणे, मुंबई, सोलापूर व अन्य जिल्ह्यातून मोठय़ा प्रमाणात स्पर्धक सहभागी होतात. यावर्षी २0१५ मध्ये गुरुवारी होणार्या या कला महोत्सवात रत्नागिरी जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी झाले आहेत. प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार मिळविणार्या स्पर्धकांना चांदीचा मुकुट प्रतीवर्षी देण्यात येतो. हा ऐतिहासिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तिपनप्पा राचट्टे, संयोजक राजू पाटील, स्वागताध्यक्ष पांडूरंग चेवले, राम कांबळे यांच्यासह पदाधिकारी कष्ट घेतात. |