शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

वाळूज उद्योनगरीत उभारणार नवीन वाहनतळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 18:29 IST

बीओटी तत्वावर नवीन वाहनतळ उभारणीचा प्रयत्न फसल्याने एमआयडीसी प्रशासनाने हा भुखंड परत घेण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील फोस्टर कंपनीजवळ बीओटी तत्वावर नवीन वाहनतळ उभारणीचा प्रयत्न फसल्याने एमआयडीसी प्रशासनाने हा भुखंड परत घेण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. या ठिकाणी नवीन वाहनतळ उभारुन कामगार चौकातील वाहनतळाचा कायपालट करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने मुंबई कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे उद्योगनगरीतील वाहतुकीला शिस्त लागणार असून,वाहने व मालाची सुरक्षा होण्यास मदत मिळणार आहे.

आशिया खंडात वेगाने विकसित होणाऱ्या वाळूज औद्योगिकनगरीत जवळपास तीन हजार लहान-मोठ्या कंपन्या आहेत. यात अनेक बहुराष्टÑीय कंपन्यांचाही समावेश आहेत. औद्योगिकनगरीतील या कंपन्यात तयार होणारे उत्पादन तसेच मटेरियल वाहनाद्वारे देशाच्या विविध भागात पोहचविले जाते. या शिवाय उद्योगनगरीत सुरु असलेल्या कंपन्यात कच्चा माल घेऊन येणाºया वाहनांचीही वर्दळ असते.

उद्योगनगरीत कामगार चौकात एकमेव वाहनतळ असून, येथे मोठ्या प्रमाणात वाहने थांबतात. मात्र या वाहनतळात अपुरी जागा असल्याने तसेच सुविधांचा अभाव असल्यामुळे बहुतांश वाहनधारक औद्योगिक परिसरात तसेच मुख्य रस्त्यावर वाहने उभी करतात. यामुळे सतत वाहतुकीची कोंडी होऊन अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या या वाहनातून माल चोरी होण्याचे प्रकार नेहमीच घडतात. उद्योनगरीत नवीन वाहनतळ उभारण्यात यावे, यासाठी उद्योजक संघटनांच्यावतीने एमआयडीसी प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे. आजघडीला कामगार चौकात एमआयडीसीचे एक वाहनतळ असून, बजाज आॅटो कंपनीचे स्वत:चे वाहनतळ आहे. बजाज कंपनीच्या वाहनतळात इतर वाहनांना थांबण्यास परवानगी नसल्याने इतर वाहनधारकांना औद्योगिकनगरीत मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी करावी लागतात.

कामगार चौकातील वाहनतळात जागा अपुरी पडत असल्याने एमआयडीसी प्रशासनाने एम सेक्टरमध्ये बीओटी तत्वार सर्व सुविधायुक्त वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला होता. याचा ठेका मुंबईच्या मे.भारत उद्योग कंपनीने घेतला होता. यासाठी एमआयडीसीने दहा एकर जागाही दिली आहे. मात्र, संबधित ठेकेदाराने या वाहनतळाचे कामच सुरु केले नाही. हा प्रयोग फसल्याने आता एमआयडीसी प्रशासनाने भारत उद्योग कंपनीला वाहनतळ उभारणीसाठी दिलेली जागा परत घेण्याची कारवाई सुरु केली आहे.

या ठिकाणी एमआयडीसीकडून वाहनतळ उभारण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. या विषयी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दुजोरा देत नवीन वाहनतळ उभारणीसाठी मुंबई कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केल्याचे त्यांनी सांगितले.

कामगार चौकातील वाहनतळाचा होणार कायापालटएमआयडीसीकडून कामगार चौकात दोन दशकांपूर्वी उभारलेल्या वाहनतळाची आजघडीला दयनीय अवस्था झाली आहे. परिसरात खड्डेच-खड्डे पडले असून, वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रसाधनगृहाची दुरवस्था झाली असून, वाहनचालक-क्लिनर यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे एमआयडीसी प्रशासनाकडून कामगार चौकातील वाहनतळात अत्यावश्यक सुविधा पुरविण्यासाठी पावले उचलण्यात आले आहे. या वाहनतळातील रस्त्याचे काँक्रिटीकरण व स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीची कामे सुरु करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याची माहिती उपअभियंता सुधीर सुत्रावे यांनी दिली.

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसीAurangabadऔरंगाबाद