नवीन औषधींची ‘क्वारंटाइन’ करून तपासणी; करमाड येथील राज्यस्तरीय औषधी भांडाराचा कधी विचार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 07:51 IST2024-12-14T07:51:19+5:302024-12-14T07:51:27+5:30

करमाडला राज्यस्तरीय औषधी भांडार उभारण्यात आले आहे. तिथे औषधी तपासणीची यंत्रणा उभारण्याच्या हालचाली झाल्या. परंतु यावर अद्याप निर्णय झालेला नाही. 

New medicines to be 'quarantined' and tested; When will a state-level medicine repository be considered at Karmad? | नवीन औषधींची ‘क्वारंटाइन’ करून तपासणी; करमाड येथील राज्यस्तरीय औषधी भांडाराचा कधी विचार?

नवीन औषधींची ‘क्वारंटाइन’ करून तपासणी; करमाड येथील राज्यस्तरीय औषधी भांडाराचा कधी विचार?

लोकमत न्यूज नेटवर्क 
छत्रपती संभाजीनगर : आरोग्य विभागाकडून सरकारी रुग्णालयांना औषधी पुरवठा केल्यानंतर प्रत्येक रुग्णालयातून औषधी नमुने ‘एनएबीएल’ मानांकन असलेल्या प्रयोगशाळेत पाठविली जातात. तोपर्यंत औषधी ‘क्वारंटाइन’ केली जातात. मात्र, मराठवाड्यात ‘एनएबीएल’ मानांकन असलेल्या लॅबच नसल्याने मुंबईसह अन्य राज्यांतील लॅबवर विसंबून राहावे लागत आहे.

करमाडला राज्यस्तरीय औषधी भांडार उभारण्यात आले आहे. तिथे औषधी तपासणीची यंत्रणा उभारण्याच्या हालचाली झाल्या. परंतु यावर अद्याप निर्णय झालेला नाही. 

सहा वर्षांपासून ‘विशाल’कडून पुरवठा
जिल्हा सामान्य रुग्णालयाला गेल्या सहा वर्षांपासून कोल्हापूरच्या मे. विशाल एंटरप्रायजेसकडून औषधी पुरवठा होतो. तसेच त्यापूर्वीही या एजन्सीकडून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला औषधी पुरवठा झाल्याचे समजते.
सात प्रकारची औषधी ‘क्वारंटाइन’
जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या राज्यपातळीवरून पुरवठा झालेल्या ७ प्रकारची औषधी ‘क्वारंटाइन’ करण्यात आलेली आहे. या औषधींचे नमुने सध्या  तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत.

२५७ प्रकारची औषधी खरेेदी
जिल्हा रुग्णालयात २५७ प्रकारची औषधी खरेदी प्रक्रिया सुरू आहे. ही सर्व औषधी प्राप्त झाल्यानंतर
ती क्वारंटाइन केली जातील. अहवाल आल्यानंतरच रुग्णांना दिली जातील. यास २० ते २२ दिवस लागतील.

आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत असलेल्या छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या चारही जिल्ह्यांचा आढावा घेण्यात येत आहे. मे. विशाल एंटरप्रायजेसने कुठे
कुठे औषधी पुरवठा केला आहे, याची माहिती घेतली जात आहे.    - डाॅ. कांचन वानेरे, उपसंचालक

Web Title: New medicines to be 'quarantined' and tested; When will a state-level medicine repository be considered at Karmad?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.