नवविवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2017 23:47 IST2017-03-24T23:44:11+5:302017-03-24T23:47:54+5:30
गेवराई : तालुक्यातील पाडळशिंगी येथील एका नवविवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली.

नवविवाहितेची आत्महत्या
गेवराई : तालुक्यातील पाडळशिंगी येथील एका नवविवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ७ च्या सुमारास उघडकीस आली.
सोनाली अनिल धुताडमल (१८, रा. पाडळशिंगी) असे त्या विवाहितेचे नाव आहे. दोरीच्या साहाय्याने तिने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या महिन्यातच तिचा विवाह झाला होता. तिचे माहेर काठोडा असून, या प्रकरणी गेवराई ठाण्यात पतीच्या खबरीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. (वार्ताहर)