अर्थसंकल्पात नवीन संकल्पनांचा समावेश
By Admin | Updated: March 20, 2016 23:57 IST2016-03-20T23:52:27+5:302016-03-20T23:57:04+5:30
औरंगाबाद : जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प तयार झाला असून, तो मंगळवारी आयोजित विशेष सर्वसाधारण सभेत अर्थ समितीचे सभापती संतोष जाधव हे सादर करणार आहेत.

अर्थसंकल्पात नवीन संकल्पनांचा समावेश
औरंगाबाद : जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प तयार झाला असून, तो मंगळवारी आयोजित विशेष सर्वसाधारण सभेत अर्थ समितीचे सभापती संतोष जाधव हे सादर करणार आहेत. पुढील आर्थिक वर्षात जि. प. च्या खर्चाला कात्री लावणारा हा अर्थसंकल्प असला तरी त्यामध्ये वित्त विभागाने दोन नावीन्यपूर्ण संकल्पनांचा समावेश केलेला आहे.
यासंदर्भात मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण यांनी सांगितले की, १५ मार्च रोजी वित्त विभागाने अर्थ समितीच्या विषय समितीमध्ये पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. २२ मार्च रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत अर्थ समितीचे सभापती संतोष जाधव हे जि. प. चा अर्थसंकल्प सादर करतील. यंदा वित्त विभागाने पहिल्यांदाच अर्थसंकल्पामध्ये नावीन्यपूर्ण दोन संकल्पनांचा समावेश केला आहे. त्यामध्ये ‘जेंडर बजेट’ आणि ‘प्रो पूअर बजेट’ (पीपी बजेट) या दोन संकल्पना आहेत. जेंडर बजेटमध्ये महिलांच्या कल्याणकारी योजनांवर जिल्हा परिषद किती खर्च करणार आहे, याची विभागनिहाय निधीची आकडेवारी असेल, तर ‘पीपी बजेट’ मध्ये एकूण अर्थसंकल्पापैकी मागासवर्गीय नागरिकांच्या विकासासाठी जिल्हा परिषद किती खर्च करणार आहे, याचा ताळेबंद असेल. आर्थिक स्रोत वाढविण्यासाठी जि. प. प्रशासन किंवा पदाधिकारी उत्सुक दिसत नाहीत. जिल्ह्यात विविध ठिकाणी जि.प.चे अनेक भूखंड व इमारती आहेत. त्यावर गाळे उभारून ते भाडेतत्त्वावर दिल्यास त्यातूनही मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकते. एकूण उपकराच्या रकमेतील २० टक्के निधी हा समाजकल्याणसाठी, महिला व बालकल्याण, तसेच अन्य विभागांसाठी १० टक्क्यांप्रमाणे खर्च केला जात आहे.