शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'ना अपक्ष, ना कोणाला पाठिंबा'; औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतून विनोद पाटील यांची माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 17:59 IST

मराठा आरक्षण याचिकाकर्ता विनोद पाटील यांची लोकसभा निवडणुकीतून माघार

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण याचिकाकर्ता विनोद पाटील यांनी औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचे आज जाहीर केले. आज दुपारी समर्थकांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत पाटील यांनी आपली भूमिका जाहीर केली. तसेच निवडणुकीत कोणत्याही उमेदवारास पाठिंबा देणार नसून तटस्थ राहणार असल्याचे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणूक जाहीर होताच विनोद पाटील यांनी औरंगाबाद लोकसभेतून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते. महायुतीकडून उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न होते. मात्र, भाजप आणि शिंदेसेनात औरंगाबादची जागा प्रतिष्ठेचा मुद्दा झाला. अखेर शिंदेसेनेला जागा सुटून महायुतीकडून पालकमंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतरही विनोद पाटील निवडणूक लढणार यावर ठाम होते. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी नागपूर येथे जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी देखील त्यांनी निवडणूक लढणारच याचा पुनरुच्चार केला होता. त्याच दिवशी अचानक संदीपान भूमरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. 

दरम्यान, मी छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवावी अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती. मी निवडणूक लढवली पाहिजे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले, पण शहरातील सत्ताधारी दोन आमदार आणि एक खासदाराने मला उमेदवारी देऊ नयेत, यासाठी टोकाचा विरोध केला, असा आरोप विनोद पाटील यांनी केला. तसेच उदय सामंत यांनी देखील भेटू घेऊन, तुम्ही आता थांबा, अशी विनंती केली. विजयाचे गणित माझ्याकडे असल्याचे सांगिताच सामंत यांनी ते माझ्या हातात नाही असे म्हंटले. त्यानंतर आज समर्थकांची बैठक घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर लोकसभा लढवली पाहिजे असा आग्रह शहरवासीयांनी धरला होता. त्यामुळे निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती, असेही पाटील म्हणाले.

अपक्ष निवडणूक लढली तरी विजय...मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून महायुतीकडून निवडणूक लढवण्यास सांगितले. कालही मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत माझं बोलणं झालं. मागील दोन तीन दिवसांत मी नागरिकांशी चर्चा केली. मी अपक्ष निवडणूक लढवल्यास मी निवडून येऊ शकतो, पण निवडून आलो नाही तर कुणाला तरी पाडण्यासाठी उभा होता हा डाग मला लावून घ्यायचा नाही. मी कुणाला फायदा व्हावा यासाठी माघार घेत नाही. उद्यापासून लोकांची भेट घेणार आहे. त्यांचे प्रश्न सोडवणार आहे. मी नाक रगडून लोकांची माफी मागतो, मी सार्थ ठरलो नाही, असेही ते म्हणाले.  ज्यांची घर काचेची असतात त्यांनी लोकांच्या घरावर दगड मारू नयेत, असा इशाराही त्यांनी दिला. 

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४