नील, अथर्व, राघव उपांत्य फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:53 IST2017-12-03T00:53:36+5:302017-12-03T00:53:54+5:30

विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या १० वर्षांखालील रँकिंग टेनिस स्पर्धेत पुण्याच्या नील जोगळेकर, अथर्व रुईकर, राघव अमीन आणि मुंबईच्या वेदांत भसीन यांनी उपांत्य फेरी गाठली.

Neil, Atharva, Raghav in the semifinals | नील, अथर्व, राघव उपांत्य फेरीत

नील, अथर्व, राघव उपांत्य फेरीत

औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या १० वर्षांखालील रँकिंग टेनिस स्पर्धेत पुण्याच्या नील जोगळेकर, अथर्व रुईकर, राघव अमीन आणि मुंबईच्या वेदांत भसीन यांनी उपांत्य फेरी गाठली.
आज झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पुण्याच्या नील जोगळेकर याने नांदेडच्या शिवतेज शिरफुले याचा ६-०, पुण्याच्या अथर्व रुईकर याने मुंबईच्या साहील कोठारी याचा ६-४, पुण्याच्या राघव अमीन याने औरंगाबादच्या विवान पगारिया याचा ६-० आणि मुंबईच्या वेदांत भसीन याने मुंबईच्या विव्हान करांदे याचा ६-० असा पराभव केला.
मुलींच्या गटात आश्मी अदकरी, सिया परसाडे, आकृती सोनकुसरे व शिरीन वाकळकर यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली. पुण्याच्या आश्मी हिने नाशिकच्या अनिषा जी. हिचा ६-०, पुण्याच्या सिया परसाडे हिने औरंगाबादच्या ईश्वरी वाघ हिचा ६-०, नाशिकच्या भक्ती एम. हिने औरंगाबादच्या रिया गिरी हिचा ६-१ आणि नाशिकच्या भक्ती ताजने हिने औरंगाबादच्या ईश्वर मारकंडे हिचा ६-४ असा पराभव केला.

Web Title: Neil, Atharva, Raghav in the semifinals