शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नेहरू भवनच्या जागी होणार भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स; दिल्लीची एजन्सी करतेय विकास आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 19:27 IST

शहरातील सांस्कृतिक चळवळींची गरज म्हणून नगरपालिकेच्या काळात सुमारे चाळीस वर्षांपूर्वी नेहरू भवन उभारले होते.

ठळक मुद्देया कामासाठी ३० कोटींचा खर्च पंधरा कोटी केंद्र शासनाकडून मिळणार

औरंगाबाद : नेहरू भवनची इमारत पाडून त्याजागी टीव्ही सेंटरच्या धर्तीवर व्यापारी संकुल विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. वर्षभरापूर्वीच सर्वसाधारण सभेने यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. दिल्लीच्या एजन्सीकडून यासंबंधीचा प्रकल्प विकास आराखाडा तयार केला जात आहे. एकूण ३० कोटी रुपये खर्चून हे व्यापारी संकुल उभारले जाणार आहे. विशेष म्हणजे, याकामी केंद्र सरकारकडून पालिकेला १५ कोटींचा निधीही मिळण्याची शक्यता आहे.

मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी नेहरू भवनच्या प्रकल्प आराखड्याविषयी शुक्रवारी पत्रपरिषदेत माहिती दिली. शहरातील सांस्कृतिक चळवळींची गरज म्हणून नगरपालिकेच्या काळात सुमारे चाळीस वर्षांपूर्वी नेहरू भवन उभारले होते. याठिकाणी नाटक, मुशायरा, गझलांच्या अनेक मैफली दिग्गज रंगकर्मींनी गाजविल्या. मात्र, मागील काही वर्षांपासून ते अडगळीत पडले होते. इमारतीचा वापरही बंदच आहे. येथील खुली जागा लग्न, खासगी समारंभासाठी वापरली जात आहे. त्यातून पालिकेला उत्पन्नही कमीच मिळते, तर इमारतीच्या देखभाल-दुरुस्तीवर जास्तीचा खर्च होतो. म्हणून ही इमारत पाडून त्याजागी प्रेक्षकगृह, समारंभ हॉल व व्यापारी संकुल तयार करण्याचा प्रस्ताव वर्षभरापूर्वी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. त्यानंतर कोरोनाच्या लॉकडाऊन काळात पालिकेने निविदा प्रक्रिया राबवून डीपीआर तयार करण्यासाठी दिल्लीच्या एजन्सीची नियुक्‍ती केली. याविषयी आयुक्‍त पाण्डेय यांनी सांगितले की, दिल्लीच्या अनुभवी एजन्सीकडून नेहरू भवनचा डीपीआर तयार केला जात आहे. या कामासाठी एकूण ३० कोटींचा खर्च येत आहे. त्यापैकी १५ कोटींचा निधी हा केंद्र सरकारकडून विशेष योजनेतून मिळणार आहे. उर्वरित १५ कोटींचा निधी पालिकेच्या माध्यमातून टीव्ही सेंटरच्या धर्तीवर गाळेधारकांकडून उभा केला जाईल.

प्रकल्पाचा खर्च दुप्पटनेहरू भवनाची जागा ही ४ हजार ५० चौरस मीटर एवढी आहे. त्यात २६ दुकाने, २४ व्यापारी कार्यालये, प्रेक्षकगृह आणि मेजवानी हॉल, वाहनतळ, असे सुरुवातीचे नियोजन होते. याकामी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दरसूचीनुसार अपेक्षित खर्च सुमारे १३ कोटी एवढा गृहीत धरून पालिकेला अपेक्षित उत्पन्न १७ कोटी रुपये मिळेल, असे वर्षभरापूर्वी ठरले होते. मात्र, आता याकामी तब्बल ३० कोटी रुपये खर्च येत आहे.

प्रशासनाकडून शिफारस अमान्यडीपीआर तयार करण्यासाठी एजन्सी नियुक्‍त करण्यासाठी निविदा प्रक्रियेत चार ते पाच कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. यात दिल्लीची एजन्सी वगळता इतर एजन्सींना काम देण्यासाठी शहरातून काही ‘खास’ व्यक्‍तींच्या शिफारशी आल्या होत्या. या शिफारशी प्रशासनाकडून धुडकावून लावण्यात आल्या.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादfundsनिधी