फौजदाराने मारहाण केल्याचा नेहे कुटुंबीयांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:06 IST2021-04-09T04:06:19+5:302021-04-09T04:06:19+5:30
वैजापूर : मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका फौजदाराने व त्यांच्या साथीदाराने आम्हाला मारहाण केली आहे, असा आरोप सिरसगाव येथील नेहे ...

फौजदाराने मारहाण केल्याचा नेहे कुटुंबीयांचा आरोप
वैजापूर : मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका फौजदाराने व त्यांच्या साथीदाराने आम्हाला मारहाण केली आहे, असा आरोप सिरसगाव येथील नेहे कुटुंबीयांनी केला आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
सिरसगाव येथील बापूसाहेब नेहे व मजनू सुभान पठाण यांच्यात जुना वाद होता. पठाण हा पोलिसांचा खबऱ्या आहे, तो चुकीची कामे करीत असतो, असा आरोप त्यांनी पठाण यांच्यावर केला. पठाण याच्या सांगण्यावरूनच फौजदार अरविंद गटकुळ, पोलीस कर्मचारी दांडगे, सोनवणे, पोलीस पाटील व अन्य दोन जण नेहे यांच्या घरी गेले. तू पोलिसांच्या नादी का लागतो, असे म्हणत शिवीगाळ करून बापूसाहेब, त्यांची आई, पत्नी व दोन मुलांना त्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत बापूसाहेब यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. फौजदाराने दारू सेवन केली असून, त्यांनी घरातील दागिनेही काढून नेल्याचा आरोप नेहे कुटुंबीयांनी केला. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.