प्रशासकीय कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:09 IST2021-02-05T04:09:23+5:302021-02-05T04:09:23+5:30
पैठण : सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेवर झाली पाहिजेत यापुढे प्रशासकीय कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. असा इशारा ...

प्रशासकीय कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही
पैठण : सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेवर झाली पाहिजेत यापुढे प्रशासकीय कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. असा इशारा रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी रविवारी पंचायत समितीच्या आढावा बैठकीत प्रशासकीय यंत्रणेला दिला. ग्रामसेवक आत्महत्येबाबत पं.स.च्या चार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री भुमरे यांनी झाडाझडती घेत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
बैठकीस रोहयो खात्याचे सचिव अशोक शिरसे, जिल्हा कृषी अधिकारी मोटे, जि.प. सभापती विलास भुमरे, ज्ञानेश्वर कापसे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे, भूषण कावसानकर, शेखर शिंदे, उपजिल्हाप्रमुख विनोद बोंबले, साईनाथ सोलाट, पं.स. सभापती अशोक भवर, उपसभापती कृष्णा भुमरे आदी उपस्थित होते. आढावा बैठकीत तालुक्यातील सामाजिक वनीकरण, वनविभाग, वैयक्तिक लाभार्थी विहिरी, सार्वजनिक विहिरी, वृक्षारोपण, घरकूल योजना तसेच रोहयो अंतर्गत सुरु असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. बैठकीत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामांची व्यवस्थित माहिती देता न आल्याने मंत्री भुमरे यांनी त्यांना चांगलेच खडसावले. चौकशीच्या भीतीने ग्रामसेवक कामे करत नसल्याचे अनेक ग्रामसेवकांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले.
बैठकीस प्रभारी गटविकास अधिकारी बागुल, नामदेव खराद, सुहास पाटील, दशरथ खराद, गणेश मडके, सतीश शेळके, पाणीपुरवठा उपअभियंता घुगे, सुधाकर काकडे, सा.बां. उप अभियंता संभाजी अस्वले, कमलाकर शिंदे, राजेश कांबळे, सतीश आखेगावकर, कृषी अधिकारी विकास पाटील, ग्रामविकास अधिकारी जिजा मिसाळ, सागर डोईफोडे, बाळासाहेब कळमकर, शैलेंद्र चौधरी, विकास चौंढे, दशरथ खरात यांच्यासह अधिकारी कर्मचारी, सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
छायाचित्र : पैठण पंचायत समितीतील आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना मंत्री संदीपान भुमरे.