शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 21:29 IST

Maharashtra Farmer Loan Waiver: महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, असे आश्वासन दिले होते. त्यासंदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता महत्त्वाची माहिती दिली आहे. 

"महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय लांबणीवर टाकलेला नाही. निवडणूक काळात भाजपाने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, ते पूर्ण करणार आहोत. गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल",अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना बावनकुळेंनी शेतकरी कर्जमाफीबद्दल भाष्य केले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "योग्य शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यावर सरकार भर देत आहे. त्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. ती समिती शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करणार असून, त्या सर्वेक्षणानंतर गरजू आणि पात्र शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळेल."

त्यानंतरच कर्जमाफीचा अंतिम निर्णय घेणार -बावनकुळे

"कर्जमाफी ही मेरिटवर झाली पाहिजे. ज्यांना खऱ्या अर्थाने मदत हवी आहे, अशा शेतकऱ्यांचा विचार केला जाईल. समाजातील सर्वात शेवटच्या घटकाला मदत करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल", असे बावनकुळे यांनी सांगितले. 

बांधकामांची यादी तयार करण्याचे निर्देश

"गुंठेवारीमध्ये अडकलेल्या घरमालकांना दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तुकडेबंदी कायद्यामुळे ज्या मिळकतींची नोंदणी होत नाही, अशा घरमालकांच्या समस्यांवर लक्ष दिले जात आहे. छत्रपती संभाजीनगरच्या आयुक्तांना २०११ पूर्वीच्या गुंठेवारीतील बांधकामांची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जास्त आकारणी केली असल्यास ती कमी करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा विचार आहे", अशी माहिती बावनकुळे यांनी यावेळी दिली. 

"महसूल विभागातील अनेक जागांवर झालेली अतिक्रमणे, वर्ग-२ जमिनी वर्ग-१ मध्ये रूपांतरित करणे आणि पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणे काढणे यांसारख्या विषयांवर काम सुरू आहे. शैक्षणिक दाखल्यांसाठी लागणाऱ्या ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरची अट रद्द करण्यात आली आहे. घर बांधण्यासाठी लागणाऱ्या मुरमासाठी रॉयल्टी घेतली जाणार नाही. तसेच सिंधी समाजाला जागा मिळवून देण्यात आली आहे", महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले. 

एनडीएचे नेते म्हणून शिंदेंची दिल्लीभेट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली भेटीबाबत बावनकुळे म्हणाले, "एनडीएचे नेते म्हणून एकमेकांना भेटणे आवश्यक आहे. अनेक राजकीय गोष्टी असतात त्यासाठी समन्वय साधणे आवश्यक असल्याने या भेटी होतात. त्यामध्ये वेगळे काही नाही. त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याही भेटी होत असतात."

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMahayutiमहायुती