शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

सक्षमीकरणासाठी पुढाकाराची गरज

By admin | Updated: March 19, 2015 23:54 IST

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाअंतर्गतची काही समुपदेशन केंद्रे कागदावरच असल्याचे तर अनेक केंद्रांपर्यंत पीडित महिला पोहोचत नसल्याचे पुढे आले आहे.

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाअंतर्गतची काही समुपदेशन केंद्रे कागदावरच असल्याचे तर अनेक केंद्रांपर्यंत पीडित महिला पोहोचत नसल्याचे पुढे आले आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने गुरूवारी प्रसिध्द करताच एकच खळबळ उडाली. विविध महिला संस्था, संघटनांनी या वृत्ताचे स्वागत करीत जिल्ह्यातील सर्व समुपदेशन केंद्र सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली. मागील काही वर्षांत महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. सन २०१४ मध्ये जिल्ह्यात बलात्काराच्या ३९ तर विनयभंगाच्या ११२ घटना घटल्या. याबरोबरच जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणांचे ३९ गुन्हे दाखल असून, यात विवाहितांनी सासरच्या जाचास कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटना सर्वाधिक आहेत. या पार्श्वभूमीवर महिला समुपदेशन केंद्र अधिक सक्षम करून महिलांना आधार देण्याची गरज आहे. जिल्ह्यातील आठ केंद्रांपैकी तुळजापूर, उस्मानाबादसह इतर काही केंद्र सक्रीय असले तरी लोहारा, वाशीसह इतर केंद्रांना अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे. या केंद्रांना निधी कशा पध्दतीने दिला जातो, याबाबतची विचारणा महिला व बालकल्याण विभागाच्या वरिष्ठ लेखा सहायकांकडे करण्यात आली होती. यावर त्यांनी २४ जानेवारी २०१४ चा ग्रामविकास विभागाच्या शासन आदेश हातावर ठेवला. सदर निधी जिल्हा परिषद उत्पन्नाच्या दहा टक्के निधीतून देण्याचे ग्रामविकास विभागाचे निर्देश आहेत. या आदेशात जिल्हा पातळीवरील समुपदेशकास बारा हजारांपर्यंत तर तालुका पातळीवरील समुपदेशकास नऊ हजारांपर्यंत मानधन द्यावे, असे ग्रामविकास विभागाचे निर्देश आहेत. मात्र, जिल्हा परिषदेच्या विषय समितीने जिल्हा केंद्रास एकत्रित बारा हजार रुपये देण्याचे निश्चित केले आहे. तर नव्या आदेशानुसार तालुका स्तरावरील केंद्रास एकत्रित नऊ हजार मिळणार असल्याने या निधीतून केंद्राचा खर्च कसा चालवायचा, असा त्यांचा प्रश्न आहे. विशेष म्हणजे, इमारत, टेबल, बाकडे वगळता या केंद्रांना कपाट, खुर्ची, संगणक आदी साहित्य पुरविण्यात आलेले नाही. समुपदेशन केंद्राशी महिलांना संपर्क साधता यावा, यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समितीमार्फत दूरध्वनीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. तसेच दूरध्वनी व इतर कार्यालयीन खर्चासाठी दर महा एक हजार रुपये शासन आदेशानुसार द्यावेत, अशीही या केंद्रांची मागणी आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही सर्व केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित तसेच कामकाजाचीे वेळोवेळी वरिष्ठांनी तपासणी करण्याची आवश्यकता आहे. काही केंद्रांचा जिथे अधिकाऱ्यांनाच पत्ता सापडत नाही, तिथे महिला पोहोचणार कशा, याबाबतही विचार करण्याची आवश्यकता अनेकांनी व्यक्त केली. ‘झेडपी’ची समुपदेशन केंद्रे कागदावरच याबाबतचे वृत्त गुरूवारी प्रसिध्द झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांनी याची गंभीर दखल घेतली. जिल्ह्यातील आठही समुपदेशन केंद्र चालविणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींना त्यांनी वर्षभरात केलेल्या कामकाजाची संपूर्ण माहिती घेऊन शुक्रवारी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.