शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
4
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
5
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
6
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
7
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
8
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
9
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
10
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण संतुलनासाठी जनजागृती आवश्यक

By admin | Updated: July 4, 2017 23:50 IST

परभणी : पर्यावरण संतुलनासाठी वनीकरण, स्वच्छता, सांडपाणी व कचऱ्याची विल्हेवाट याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पर्यावरण संतुलनासाठी वनीकरण, स्वच्छता, सांडपाणी व कचऱ्याची विल्हेवाट याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर यांनी केले.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने शिवा शंकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पर्यावरण समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीस जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर, मनपा आयुक्त राहुल रेखावार यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर शिवा शंकर म्हणाले, ज्या साखर कारखान्यामुळे तलावातील मासे मरण पावल्याची घटना घडली, त्याची प्रदूषण नियंत्रण मंडळाने सखोल चौकशी करावी, मास्यांचे नमुने प्रयोगशाळेला पाठविले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले. शहरातील घनकचरा व्यवस्थापन व विविध नाल्यांमार्गामुळे होणारे प्रदूषण या विषयावर चर्चा झाली. शहरातील कचऱ्याचे डंपिंग ग्राऊंड पाच महिन्यात स्वच्छ केले जाणार असून त्यासाठी एका संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती मनपाने दिली. बैठकीस विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ.दत्तप्रसाद वासकर, प्राचार्या संध्याताई दुधगावकर, डॉ. एल. एन. जावळे, कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर, उद्योग व्यवस्थापक डी. आर. भगुरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन मायेकर, उपकार्यकारी अभियंता ए. बी. तुसे, शल्य चिकित्सक डॉ. अथर आदींची उपस्थिती होती.