राष्ट्रवादी काँग्रेसला चार अपक्षांचे आव्हान
By Admin | Updated: June 27, 2014 00:11 IST2014-06-26T23:22:48+5:302014-06-27T00:11:55+5:30
औसा : औसा नगरपालीकेच्या प्रभाग ५ मधील सर्व साधारण महिला उमेदवारासाठी राखीव असलेल्या जागेसाठी २९ जून रोजी मतदान होणार आहे़

राष्ट्रवादी काँग्रेसला चार अपक्षांचे आव्हान
औसा : औसा नगरपालीकेच्या प्रभाग ५ मधील सर्व साधारण महिला उमेदवारासाठी राखीव असलेल्या जागेसाठी २९ जून रोजी मतदान होणार आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवीका सुरय्या मुक्तार कुरेशी यांनी राजीनामा दिल्यामुळे हि पोटनिवडणूक होत आहे़ निवडणूकीच्या रिंगणात एकूण ५ उमेदवार असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार चांदबी पटेल यांच्या विरोधात ४ अपक्ष उमेदवार लढतीत आहेत़ कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवारच उभा केला नाही़ त्यामुळे हि निवडणूक अटीतटीची होत नसल्याचे चित्र प्रचाराच्या अंतिम टप्प्यात दिसून येत आहे़
नगर पालीकेच्या गेल्या दोन्ही सार्वत्रीक निवडणूकीत प्रभाग 5 मधील सर्व तिनही जागा जिंकून राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम केले होते़ गेल्या निवडणूकीत या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेस व शिवसेना भाजप युतीने आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले होते़ मात्र आत्ताच्या पोटनिवडणूकीत या दोन्हीनीही उमेदवारच उभा केला नाही़ ही जागा राष्ट्रवादीची असल्यामुळे आम्ही उमेदवार उभा केला नसल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रा़महम्मद हनिफ आलुरे यांनी सांगीतले़ तसेच यावेळी आम्ही आघाडीचा धर्मही पाळला असल्याचेही ते म्हणाले़
प्रभाग ५ मध्ये अनुकूल राजकीय परिस्थितीत नसल्यामुळे आम्ही उमेदवार केला नसल्याचे शिवसेनेच शहरप्रमुख सुरेश भुरे यांनी स्पष्ट केले़ त्यांच्या या निर्णयामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र नाराजीचा सुरू उमटत आहे़ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पटेल चांदबी अखलाख यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधात पठाण तहसीन असलम (अपक्ष), मंगल काशिनाथ बेवनाळे (अपक्ष), शेख मेहराजबी ताजोद्दीन (अपक्ष), शेख रजियाबी नजीर साब (अपक्ष) या महिला उमेदवार लढत देत आहेत़ नगर पालीकेतील राष्ट्रवादीचे गटनेते अफसर शेख यांनी प्रचाराची संपूर्ण धुरा आपल्या खाद्यांवर घेतली असून चांदबी पटेल यांच्या विजयासाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहेत़ तर अपक्ष उमेदवार रजीयाबी शेख व तहसिन पठाण हे त्यांच्याशी निकराने झुंज देत असल्याचे चित्र प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पाहवयास मिळत आहे़ शेवटी कोण बाजी मारणार हे चित्र निकाला नंतरच स्पष्ट होणार आहे़(वार्ताहर)
रविवारी मतदान तर सोमवारी मोजणी
रविवारी २९ जून रोजी औसातील नगर पालीकेच्या प्रभाग क्रं ़ ५ मधील सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी राखीव असलेल्या जागेसाठी मतदान होणार असून ४१८४ मतदार संख्या असलेल्या या प्रभागातील पोट निवडणूकीची संपूर्ण तयारी झाली असल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगर पालीकेचे मुख्याधिकारी मल्लीकार्जुन पाटील यांनी सांगीतले असून या पोटनिवडणूकीची मतमोजणी सोमवारी होणार असल्याचेही त्यांनी लोकमतशी बोलतानी सांगीतले़