शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
2
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
4
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
5
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
6
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
7
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
8
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
9
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
10
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
11
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
12
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
13
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
14
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
15
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
16
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
17
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
18
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
19
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
20
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा

शक्तिप्रदर्शनाने राष्ट्रवादीचा औरंगाबादेत ‘हल्लाबोल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 12:14 AM

केंद्र व राज्य सरकारच्या मराठवाडाविरोधी भूमिकेचा निषेध करून रखडलेली विकास प्रक्रिया सुरू करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तुळजापूर ते औरंगाबादपर्यंत ‘हल्लाबोल’ संघर्ष यात्रा आयोजित केली होती. या संघर्ष यात्रेचा समारोप विभागीय आयुक्तालयासमोर शनिवारी (दि.३) आयोजित विराट सभेने झाला. यावेळी राष्ट्रवादीने जोरदार शक्तिप्रदर्शन करीत सरकारवर ‘हल्लाबोल’ केला.

ठळक मुद्देक्रांतीचौक ते विभागीय आयुक्तालय मोर्चा : पारंपरिक वाद्य, सजीव देखावे अन् हजारोंच्या उपस्थितीने यात्रेचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : केंद्र व राज्य सरकारच्या मराठवाडाविरोधी भूमिकेचा निषेध करून रखडलेली विकास प्रक्रिया सुरू करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तुळजापूर ते औरंगाबादपर्यंत ‘हल्लाबोल’ संघर्ष यात्रा आयोजित केली होती. या संघर्ष यात्रेचा समारोप विभागीय आयुक्तालयासमोर शनिवारी (दि.३) आयोजित विराट सभेने झाला. यावेळी राष्ट्रवादीने जोरदार शक्तिप्रदर्शन करीत सरकारवर ‘हल्लाबोल’ केला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेतकरी, जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सरकारविरोधी ‘हल्लाबोल’ संघर्ष यात्रा काढली आहे. दुसºया टप्प्यात मराठवाड्यात ही यात्रा आयोजित केली होती. या यात्रेची सुरुवात तुळजापूर येथून झाली. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांतील विविध ठिकाणी यात्रेच्या माध्यमातून मोर्चे, सभा घेऊन जनतेला न्याय देण्याची मागणी करण्यात आली. या यात्रेचा समारोप विराट मोर्चानंतर पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत आयोजित सभेने शनिवारी (दि.३) औरंगाबादेत झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यभरातील प्रमुख नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीतर्फे क्रांतीचौक ते विभागीय आयुक्तालय असा राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.मोर्चाला ज्येष्ठ नेते अरुण गुजराथी, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. सुप्रिया सुळे, आ. जयंत पाटील, आ. दिलीप वळसे पाटील आदी उपस्थित होते. मराठवाड्याच्या कानाकोपºयातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोर्चास्थळी पारंपरिक वाद्य, हलगी, संबळाच्या आवाजात दाखल होत होते.उन्हाचा पारा चढलेला असतानाही लोकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाच्या सर्वात पुढे शेतकरी आत्महत्येचा सजीव देखावा तयार करण्यात आला होता. यानंतर विद्यार्थिनी, महिला, पदाधिकारी आणि नागरिक अशी रचना केली होती.महिलांचे नेतृत्व खा. सुप्रिया सुळे यांनी केले, तर मोर्चाच्या मध्यभागी एका वाहनातून आ. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सहभागी झाले होते. क्रांतीचौकातून निघालेला मोर्चा पैठणगेट येथे आल्यानंतर गोविंदभाई श्रॉफ, लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यांना अजित पवार यांनी अभिवादन केले. तेथून गुलमंडी, सिटीचौक, गांधी चौक, शहागंज, चेलीपुरामार्गे विभागीय आयुक्तालयापर्यंत मोर्चा निघाला. विभागीय आयुक्तालयासमोरील दिल्लीगेट येथे आयोजित सभेने मराठवाड्यातील हल्लाबोल संघर्ष यात्रेचा समारोप झाला.राष्ट्रवादीच्या राज्यभरातील नेत्यांची हजेरीराष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मराठवाड्यात आयोजित दुसºया टप्प्यातील हल्लाबोल संघर्ष यात्रेच्या समारोपाला राज्यभरातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. यामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आ. अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,ज्येष्ठ नेते अरुण गुजराथी, खा. अ‍ॅड. माजीद मेमन, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, खा. विजयसिंह मोहिते पाटील, खा. सुप्रिया सुळे, खा. धनंजय महाडिक, आ. जयंत पाटील. आ. दिलीप वळसे पाटील, आ. जयदत्त क्षीरसागर, आ. हसन मुश्रीफ, आ. हेमंत टकले, आ. जितेंद्र आव्हाड, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, आ. राजेश टोपे, आ. अमरसिंह पंडित, आ. प्रकाश गजभिये, आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, आ. बाबाजानी दुर्राणी, आ. राणा जगजितसिंह पाटील, आ. विजय भांबळे, आ. डॉ. मधुसूदन केंद्रे, आ. राहुल मोटे, आ. रामराव वडकुते, माजी मंत्री कमलकिशोर कदम, माजी मंत्री प्रकाश सोळुंके, फौजिया खान, प्रवक्ते नवाब मलिक, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य राणा पाटील, माजी खासदार गणेशराव दुधगावकर, सचिन अहिर आदींसह आठही जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते.स्थानिक कार्यकर्तेशहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे, नीलेश राऊत, माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय, कदीर मौलाना, अभिजित देशमुख, ख्वाजा शरफोद्दीन, अंकिता विधाते, ज्योती मोरे, मेहराज पटेल, अनुपमा पाथ्रीकर, अभय पाटील चिकटगावकर, दत्ता भांगे, अक्षय पाटील, मयूर सोनवणे, अमोल दांडगे.सभेला रात्री अडीच वाजता मिळाली परवानगीया सभेला पोलिसांनी वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, म्हणून परवानगी दिली नव्हती. सुभेदारी विश्रामगृहाकडे जाणाºया मार्गावर सभेचा मंच उभारण्याची सूचना पोलिसांनी केली. मात्र दिल्लीगेटच्या समोरच मंच उभा करण्यावर राष्ट्रवादी ठाम होती. या सर्व वादावादीतून राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष दत्ता भांगे यांना रात्री अडीच वाजता बोलावून घेतले.यानंतर त्यांच्याकडून विविध बाबींची हमी घेतल्यानंतर सभेला परवानगी दिल्याचे आयोजकांनी सांगितले.धनंजय मुंडे, सतीश चव्हाणांचा बोलबालाच्राष्ट्रवादीतर्फे आयोजित हल्लाबोल संघर्ष यात्रेचा समारोप औरंगाबादेत झाला. या मोर्चाचे नियोजन विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि आ.सतीश चव्हाण यांनी केले होते. परवानगीपासून ते मोर्चाच्या मार्गावर लावण्यात आलेल्या सर्व बॅनरवर दोघेच दिसून येत होते. सभास्थळीही राष्ट्रवादीच्या नेत्यांचे स्वागत करणारे फलक आ. चव्हाण यांनीच लावलेले होते. सूत्रसंचालकांपासून ते कोण केव्हा बोलणार याच्या सूचनाही दोघेजणच देत असल्याचे दिसून आले.