शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मताची विभागणी करण्यासाठी राज्यात नवीन दुकान आणले; जयंत पाटलांचे भाजपवर टीकास्त्र

By बापू सोळुंके | Updated: June 18, 2023 19:09 IST

राज्यसरकार कुचकामी असल्याने शेतकऱ्यांना तेलंगणात कांदा विक्री करावी लागत आहे

बापू सोळुंके, छत्रपती संभाजीनगर: सरकार आल्यापासून कापसाचे दर १३ हजारावरून साडेसहा हजारावर आले, मिळत नसल्यामुळे कांदा, टमाटे शेतकऱ्यांना रस्तावर फेकून द्यावे लागले. राज्यातील शेतकरी निवडणुकीची वाटपच पहात आहे. शेतकरी आपल्याबद्दल नाराजी व्यक्त करतील, हे सरकारच्या लक्षात आले आहे. शेतकऱ्यांची मते विभागणीसाठी सरकारने राज्यात एक नवीन (बीआरएस)दुकान आणले,असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे केला.

छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय कक्षाच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबीराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ.सतीश चव्हाण, अमरसिंह पंडित, विचारवंत रावसाहेब कसबे, लोकमतचे पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटी, रा.काँ. युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, संयोजक जयदेव गायकवाड, प्रा. सुनील मगरे, प्रा.प्रतिभा अहिरे,अभिषेक देशमुख आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, फुले,शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज,सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांनी समाजसुधारण्यासाठी काम केले. या कामामुळे मुठभर लोकांची अडचण झाली. या सर्व महापुरूषांच्या प्रतिमा मोडल्या पाहिजे यासाठी काम गेले काही दिवस सुरू आहे. कधी राज्यपाल बोलले असतील तर कधी आमदार बाेलले असतील. याचा अर्थ तुमच्याआमच्या श्रद्धेवर हातोडा मारण्याचे काम अप्रत्यक्ष कोणीतरी करतेय.

छत्रपती शिवाजी महाराजांसारखी राजवट असती तर, त्या राज्यपालाला मुसक्या बांधून परत त्याच्या राज्यात परत पाठविण्याची व्यवस्था झाली असती. आज येथे विचारवंताची मांदीयाळी सतत व्हायला हवी.अशा शिबिरांचे आयोजन व्हायला हवे, पक्ष तुमच्या पाठिशी आहे, असे त्यांनी नमूद केले. आज दिवसभरात विचारवंत संपादक संजय आवटे, रावसाहेब कसबे, डाॅ.प्रल्हाद लुलेकर, लेखिका प्रतिभा अहिरे,प्रा,सुरेंद्र जाेंधळे यांनी विचार मांडले. प्रा.सुनील मगरे यांनी प्रास्तविक करताना पक्षाच्या फादर बॉडीकडून सामाजिक न्याय विभागाच्या पदाधिकाऱ्यांची दखल घेतली जात नाही,अशी खंत व्यक्त केली. शिवाय आगामी काळात पक्ष सत्तेत आल्यानंतर सामाजिक न्याय विभागाच्या कार्यकर्त्यांना सत्तेचा लाभ मिळाव,अशी अपेक्षा व्यक्त केली.

राज्यसरकार कुचकामी असल्याने शेतकऱ्यांना तेलंगणात कांदा विक्री करावी लागत आहेतेलंगणामध्ये कांदा कांद्याचा दर जोपर्यंत तेलंगणामध्ये चांगला आहे तोपर्यत शेतकरी तिकडे जात राहतील. राज्यसरकारने तेलंगणा एवढा दर राज्यात मिळेल यासाठी काळजी घेणे आवश्यक होते. राज्यसरकार कुचकामी असल्याने येथील शेतकऱ्यांना कांदा विक्रीसाठी तेलंगणा राज्यात जावे लागत आहे. मात्र याचा अर्थ लाेक बीआरएसला मते देतील असा होत नाही,असे जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलAurangabadऔरंगाबादNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समिती