इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:04 IST2021-01-13T04:04:56+5:302021-01-13T04:04:56+5:30

आधी हे आंदोलन क्रांती चौक ते पैठणगेटपर्यंत करण्यात येणार होते; परंतु पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे क्रांती चौकातच एका चारचाकी ...

Nationalist Youth Congress agitation against fuel price hike | इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

आधी हे आंदोलन क्रांती चौक ते पैठणगेटपर्यंत करण्यात येणार होते; परंतु पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे क्रांती चौकातच एका चारचाकी वाहनास धक्का मारून हे आंदोलन तिथेच संपविण्यात आले. 'इंधन दरवाढ मागे घ्या, वाह रे मोदी तेरा खेल, सोने के दाममें मिलता तेल' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

इंधन दरवाढ त्वरित मागे घ्या, अन्यथा महाराष्ट्रात केंद्रीय मंत्र्यांना फिरू न देण्याचा इशारा यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता भांगे यांनी दिला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे, कय्युम शेख, रवी तांगडे पाटील, नागेश भालेराव, पंकज अंभोरे, जुबेर खान, अमोल देशमुख, सचिन भांबट, मयूर कालभिले, पंकज पेंडकर, मयूर अंधारे, मेहबूब शेख, इस्माईल राजा, बंडू शेळके, अनिल भालेराव, श्रीराम नागे, शिवम रेंगे, रवी बकाल, गणेश आवारी, आनंद मगरे, बाळू कोल्हे, संदेश कांबळे, दिनेश नवगिरे, सुनील बनकर, इफ्तेकार शेख, प्रेम सोनवणे, शुभम साळवे, मिलिंद जमधडे, आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.

Web Title: Nationalist Youth Congress agitation against fuel price hike