शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी ९० जागी स्वबळावर

By admin | Updated: April 7, 2015 01:28 IST

औरंगाबाद : काँग्रेससोबत आघाडी करण्याची बोलणी संपूर्णपणे फिस्कटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याची तयारी केली असून,

औरंगाबाद : काँग्रेससोबत आघाडी करण्याची बोलणी संपूर्णपणे फिस्कटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याची तयारी केली असून, सोमवारी दुपारपासून निश्चित केलेल्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटपही सुरूकेले आहेत. सुमारे ९० जागांवर उमेदवार उभे केले जातील, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष मुश्ताक अहमद यांनी दिली. काँग्रेसशी होणाऱ्या आघाडीत बिघाडी झाल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसने निश्चित केलेल्या उमेदवारांना अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या असून, मंगळवारी सर्वच उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. पक्षाचे प्रवक्ते आ. सतीश चव्हाण, शहराध्यक्ष मुश्ताक अहमद, कार्याध्यक्ष विनोद पाटील, माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय, नगरसेवक अभिजित देशमुख यांच्या उपस्थितीत व्यापक बैठक होऊन त्यामध्ये पक्षाने निश्चित केलेल्या उमेदवारांंना एबी फॉर्म वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दुपारपासून एबी फॉर्मचे वाटपही सुरूकरण्यात आले. सोमवारी सायंकाळपर्यंत ७५ उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली. आणखी जागांवर एबी फॉर्म देण्याचे काम बुधवारी सकाळी होणार आहे. शिवसेना- भाजप तसेच एमआयएमला टक्कर देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली पाहिजे, असा विचार सुरू होता. माजी मंत्री आ. राजेश टोपे, आ.सतीश चव्हाण या मंडळींनी काँग्रेससोबत आघाडीशी दोन ते तीन वेळा बोलणीही केली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचीही चर्चा झाली. रविवारी रात्रीपर्यंत आघाडी होण्याचे संकेत मिळत नव्हते. दोन्ही पक्षांनी रविवारी रात्रीच निश्चित केलेल्या उमेदवारांना अर्ज भरण्यासंबंधी सूचना देण्यास सांगितले होते. त्यामुळे आघाडी झाली नसल्याचे सोमवारी सकाळी स्पष्टपणे पुढे आले. त्यामुळे सोमवारी सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेसने एबी फॉर्मचे वाटपही सुरू केले. आ. सतीश चव्हाण यांनी सांगितले की, आम्ही जास्तीत जास्त जागा लढविण्याचा प्रयत्न करणार आहोत. पक्षाने सर्वच वॉर्डातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. ४आमच्याकडे सर्व ११३ वॉर्डासाठी उमेदवार आहेत. मात्र, ज्याठिकाणी पक्षाची फारशी शक्ती नाही, त्याठिकाणी आम्ही उमेदवार देणार नाही. ज्या वॉर्डात आमचा उमेदवार नसेल तेथे काय करायचे हे नंतर ठरविण्यात येईल.पक्षातर्फे मंगळवारी आणि बुधवारी उमेदवारांना अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आले आहे. उमेदवार निवड समितीमार्फत ज्यांची नावे अंतिम करण्यात आली आहेत, त्यातील बहुसंख्य उमेदवार बुधवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यानंतर बुधवारी सायंकाळपर्यंत उमेदवार यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे पक्षातर्फे ‘आधी उमेदवारी; नंतर यादी’ असा नवा फॉर्म्युला अंमलात आणण्यात आला.