राष्ट्रीय सेवा योजनेच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:05 IST2021-03-18T04:05:11+5:302021-03-18T04:05:11+5:30

राष्ट्रीय सेवा योजनेच्या ‘ई-जर्नल’चे प्रकाशन औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या त्रैमासिकाचे (एनएसएस ई-जर्नल) ...

Of the National Service Plan | राष्ट्रीय सेवा योजनेच्या

राष्ट्रीय सेवा योजनेच्या

राष्ट्रीय सेवा योजनेच्या ‘ई-जर्नल’चे प्रकाशन

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या त्रैमासिकाचे (एनएसएस ई-जर्नल) विमोचन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यापीठाच्या वेबसाइटवर हे त्रैमासिक वाचकांसाठी उपलब्ध आहे. या त्रैमासिकाच्या संपादक समितीमध्ये प्रमुख संपादक कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी आहेत आणि संपादक रासेयो संचालक डॉ. टी. आर. पाटील आहेत. या समितीमध्ये जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांच्यासह औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मानाबादचे रासेयो जिल्हा समन्वयक, स्वयंसेवक प्रतिनिधी हे सदस्य आहेत. पहिल्या अंकाचे ‘ई-जर्नल’मध्ये रूपांतर करून वेबसाइटवर प्रकाशित करण्याकरिता लागणारी सर्व कॉम्पुटर प्रोग्रामिंग आणि कोडिंग उन्नत भारत अभियानच्या प्रकल्प सहायक प्रा. आम्रपाली त्रिभुवन यांनी केले आहे. यावेळी प्र-कुलगुरू प्रो. डॉ. श्याम शिरसाट उपस्थित होते.

Web Title: Of the National Service Plan